लेखक:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवास राव
सहशिक्षक श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद।
=============================================================================================
मानवी जीवन हे खूप मूल्यवान आहे ,सुंदर आहे, मानवी जीवन हे जगण्यासाठी आहे, जीवन खुप सुंदर आहे, गोड आहे, अमृतासमान मधुर आहे ,जीवन एक कसोटी आहे, जीवन ऊन सावलीचा खेळ आहे, जीवन एक अनुभव आहे, जीवन जगण्यासाठीच आहे फक्त जगण्यासाठी! जीवनात सुख आहे सुख मानले पाहिजे. जीवनात दुःख आहे ते विसरले पाहिजे, जीवनात संकटे आहेत त्यावर मात करता आली पाहिजे, जीवन हे मानलं तर सुंदर गुलाबाच्या फुलाप्रमाणे आहे नाही तर काटेरी वनात प्रमाणे आहे, काटेरी बाभळी सारखे बोचणारे काटे आहेत, बोरीच्या काट्याप्रमाणे अडकणारे आहे!
काही अडचणी किती ही कष्टानंतर सुंदर वाटतात काहींना ते भीषण वाटतात! दिवसभर मेहनत करणाऱ्या काबाडकष्ट करणाऱ्या व्यक्तीला रात्री किती छान झोप लागते ते खरे जीवनातील सुख व आनंदआहे! बारकाईने विचार केला तर हे जग किती सुंदर आहे, स्वच्छ आहे ,निसर्ग किती प्रेमळ व मायाळू आहे! निसर्गातील जीव किती सुंदर व प्रेरणादायी आहेत निसर्गाच्या पुढे माणूस शून्य आहे! निसर्ग आपल्याला सर्व गोष्टी मोफत देतो त्याचा मोबदला तो घेत नाही निसर्ग हा निस्वार्थीआहे त्याच्या सनिध्यात राहणारे खुप आंनदी व निरोगी राहतात.नैसर्गिकता आपल्यावर प्रेम करतो आजचीच अवस्था बघा आज आपण घरात बंदिस्त आहोत आणि सारे पशु, पक्षी, प्राणी ,निसर्गात निसर्गाचा आनंद घेत आहेत मुक्त संचार करीत आपले जीवन कंठत आहेत आज किती बिकट परिस्थितीतून आपण जात आहोत कधी !
आपण कुणी स्वप्नातही स्वप्न बघितले नसेल !कल्पनाही केली नसेल की ऑक्सिजन संपणार आहे ऑक्सीजन संपले आहे प्राण वायू मिळणार नाही व प्राणवायू न मिळाल्यामुळे लाखो लोकांचे प्राण जातील!! पण आज हे वास्तव सत्य आहे कोरोना च्या या विषाणूमुळे दररोज लाखो लोकांचे प्राण जात आहेत जो निसर्ग आपल्याला प्राणवायू देतो शुद्ध ऑक्सिजन देतो ही निसर्गातील वृक्षच आपण जर नष्ट करीत आहोत, आपण स्वतः आपल्या हातानेच ही परिस्थिती ओढ़वून आणलेली आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. स्वच्छंद आकाशात उडणारे सुंदर सुंदर पक्षी पहा व त्यांचे स्वतंत्र उडणे किती मोहक वाटते. आपल्यालाही तसंच त्यांच्या सारखेच आनंदाने राहायला हवं असं जगा की, जगणं सुंदर झालं पाहिजे
वादळात घरटं मोडलेल्या चिमणी व चिमणा दोघेजण संध्याकाळी विचार करतात- चिमणी खूप दुःखी होऊन जाते घाबरलेली आहे उदास झालेली आहे त्यावेळी चिमणा तिला समजावताना म्हणतो आग वेडी त्यात काय एवढं ही संध्याकाळ जाऊदे उद्या नवीन दिवस उजाडेल आणि आपण नवीन घरटं बांधायला सुरू करू किती प्रेरणादायी व सकारात्मक विचार आहेत पहा तसं आज आपल्या सर्वावर आलेली ही वेळ संपणारी आहे हे ही दिवस निघून जातील फक्त धीर धरायचा आहे व आलेल्या संकटाला न घाबरता तोंड द्यायचे आहे ही कोरोनाची भयंकर रात्र निघून जाणारी चाहे व पूर्वी सारखा चांगला काळ येणार आहे उज्वल भविष्यासाठी येणाऱ्या वादळाचा सामना करावाच लागेल
प्रसिद्ध हिंदी कवि डॉक्टर हरिवंशराय बच्चन यांची एक कविता खूप प्रेरणादायी आहे” नीड का निर्माण फिर फिर “ंअंधार्या रात्री नंतर सुंदर सकाळ होणारच आहे नवीन अशा, नवीन स्वप्न, नवीन विचार, घेऊन पुढचा दिवस पुढचा येणारा दिवस काढायचा आहे म्हणून अंधाऱ्या या रात्रीला घाबरण्याचे काहीच कारण नाही” उषःकाल होता होता काळरात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली अगदी असंच संकटावर मात करीत आपल्याला कोरूना सारख्या विषाणूला हरवायचं आहे या कोरोणाच्या महामारीत मास्क,सानी टायझर वापरून गर्दी टाळायची आहे व या काळातील संपुर्ण अनुभव घ्यायचा आहे व पुढील येणाऱ्या काळात धाडसी पणाने आरोग्य भक्कम करायचे आहे ,त्यासाठी आपल्याला सुदृढ आरोग्यासाठी लस घ्यायची आहे लस ही दोन टप्यात घ्यायची आहे पहिली लस घेतल्यानंतर किमान 28 दिवसांनी दुसरी लस घ्यायची आहे व त्याचे सर्व नियम काटेकोरपणे पाळावयाचे आहेत मास्क व सानी टायझर आपला कायम सोबती असणार आहे
ज्या पर्यावरणात आपण राहतो जीवन व्यतीत करतो जगतो ते पर्यावरण सुंदर स्वच्छ ठेवणे आपली प्रथम जबाबदारी आहे प्रदूषण कमी करणे त्यासाठी वृक्षांची सेवा करणे ही काळाची गरज आहे आपले जीवन सुंदर बनवण्यासाठी आपले जगणे आनंदी समाधानी बनवण्यासाठी प्रत्येकाने एक तरी झाड लावावे व त्या झाडास आपल्या मुला बाळाप्रमाणे सांभाळावे हीच झाडे आपल्याला ऑक्सिजन पुरवतात, हीच झाडे आपल्याला शुद्ध प्राणवायू देतात! जी ऑक्सिजन मिळवण्यासाठी आज जिवाची धडपड चाललेली आहे परंतु देवाने आपल्याला या निसर्गात मोफत असे ऑक्सिजन दिले आहे त्याचा पुरेपूर वापर आपण केला पाहिजे ऑक्सिजन न मिळाल्यामुळे आज लाखो रुग्णांचा मृत्यू होतो आहे. आपल्या पृथ्वीवर ऑक्सिजनचा चांगला पुरवठा होण्यासाठी प्रथम झाडे लावली पाहिजेत, पूर्वीच्या काळी खूप मोठ्या प्रमाणावर झाडे होती म्हणून भयंकर रोगाचा प्रादुर्भाव कमी होत होता पूर्वी आपण पाहिलेले आहे आपल्या अवतीभोवती मोठमोठे पिंपळाची झाडे ,वडाची झाडे होती पिंपळाचे झाड वडाचे झाड हे खूप मोठ्याप्रमाणात आपल्याला ऑक्सिजन देतात वडाचे झाड हे एका तासाला साधारणपणे सातशे बारा किलो ह्या प्रमाणात ऑक्सिजन वातावरणात सोडत असतात तसेच त्याची पाने दिवसभर प्रदूषण शोषून घेण्याचे कार्य करतात अगदी तसंच पिंपळाच्या झाडाचे महत्त्व तर खूप प्राचीन काळापासून आहे साधारणपणे सर्व झाडे ही दिवसभर ऑक्सिजन देतात पण पिंपळाचे झाड हे दिवस आणि रात्र आपल्याला मोफत ऑक्सिजन देते त्याच बरोबर बरीच झाडे आपल्या पर्यावरणाचे शुद्धीकरण करतात व प्रदूषण दूर करण्याचा प्रयत्न करतात त्यामध्ये अशोकाची झाडे, बांबूची झाडे, कडुनिंबाची झाडे. आपल्या अंगणातील तुळस ही खूप पवित्र व शुद्ध मानली जाते पूर्वीच्या काळी घरोघरी अंगणात तुळशी असायची दररोज सकाळ-संध्याकाळ तुळशीची पूजा व्हायची गळ्यात तुळशीची माळ असायची त्यामुळे सर्व वातावरण परिसरातील वातावरण शुद्ध व सात्विक मंगलमय असायचे तसेच निवडूंगाचे झाड ,उंबराचे झाड, जांभळाचे झाड, त्याच बरोबर गुळवेल अशा प्रकारची वनस्पती ही मानवाला आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी खूप मोठी मदत करतात म्हणून आज आपल्याला ही झाडे लावण्याची अत्यंत गरज आहे
आपल्याला देवाने दोन गोष्टी खूप महत्वाच्या दिलेल्या आहेत त्या म्हणजे स्मरण आणि विस्मरण आजची ही परिस्थिती ही तशीच काही आहे दुःख सारे संकट सारे विस्मरण करून टाकायचे आहे आणि आपले जीवन आनंदी बनवायचे आहे वाट्याला आलेल्या संकटाचा सामना करत जीवन हसत हसत जगायचे आहे आपण आनंदी राहात दुसऱ्याला आनंदी करावयाचे आहे देवाने आपल्याला दिलेल्या दोन अमूल्य गोष्टींचा उपयोग आपल्याला करायचा आहे चांगल्या गोष्टी, नेहमी चांगले कार्य, चांगले प्रसंग ,चांगले विचार, स्मरण करावे व वाईट किंवा भयंकर, समस्याग्रस्त प्रसंग, वाईट घटना ,या विस्मरण करून टाकाव्यात तरच आपल्या जीवनाचे पाऊल पुढे पडेल व आपण आनंदी जीवन जगू शकू आपले जगणे असे असावे की, आपल्यापासून दुसऱ्याला आनंद मिळावा आपल्यापासून दुसऱ्याला शक्ती ऊर्जा प्रेरणा त्याचबरोबर सकारात्मक विचार मिळावेत म्हणजेच सर्वांचे जीवन आनंदमय होऊन जाईल. पूर्वी आपल्या लहानपणी आपण सर्वांनी ही कविता वाचलेली आहे “देवा तुझे किती सुंदर आकाश सुंदर प्रकाश सूर्य देतो” या कवितेच्या संदर्भावरून आपण अनुभव घेऊ शकतो की आपले जीवन किती सुंदर आहे,
हा निसर्ग किती सुंदर आहे! हा निसर्ग आपल्याला सर्व काही मोफत देतो सूर्यप्रकाश, हवा, शुद्ध प्राणवायू, आपला श्वास श्वास निसर्गातील या शक्तीवर अवलंबून आहे! हीच शक्ती आपले जगणे आनंदित करते म्हणून या निसर्गसंपत्ती ला जपले पाहिजे त्यांचे संवर्धन केले पाहिजे ही काळाची गरज आहे त्रिवार नमन या निसर्ग देवतेला!
🙏🏻🙏🏻