साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले,
विभागीय संपादक-मराठवाडा.
धाराशिव (उस्मानाबाद) – धाराशिव (उस्मानाबाद) येथील कृषि महाविद्यालयात कार्यरत असलेले वनस्पती शास्त्राचे प्रा. श्री. बुरगुटे सर यांना २०२१ साल चा “एज्युकेशन सेन्सेशन” प्रस्तुत “टिचिंग एक्सलन्स – यंग टीचर ऑफ द इयर पुरस्कार” प्रदान करण्यात आला आहे.
२०२१ साल चा “एज्युकेशन सेन्सेशन” प्रस्तुत “टिचिंग एक्सलन्स” चे पुरस्कार दि. २७ एप्रिल २०२० रोजी वितरित करण्यात आले. यामध्ये कृषि महाविद्यालय, आळणी-धाराशिव (उस्मानाबाद) येथे कार्यरत असलेले प्रा. बुरगुटे कानिफनाथ अण्णासाहेब (Msc Agri, Net) यांना “यंग टीचर ऑफ द इयर पुरस्कार” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
प्रा. बुरगुटे सर हे कृषी महाविद्यालय आळणी-गडपाटी (धाराशिव/उस्मानाबाद) या महाविद्यालयात वनस्पती रोगशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असून त्यांच्या शिकविण्याच्या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये ते विशेष लोकप्रिय म्हणून ओळखले जातात. प्रात्यक्षिक शिकविण्यावर जास्त भर असल्याने त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
हा पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम दि. २७ एप्रिल २०२१ रोजी दुपारी ४ वाजता संपन्न झाला. या कार्यक्रमात त्यांनी “शिक्षणाचे महत्त्व” विषयावर आपले विचार मांडले. आपल्या भाषणात त्यांनी त्यांच्या अशिक्षित आई-वडिलांच्या त्यांच्या मुलाला म्हणजे बुरगुटे सर यांना किती कष्ट करुन उच्चशिक्षित केले याचे उदाहरण दिले. यामध्ये त्यांनी शिक्षणाचे मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी असलेले महत्त्व पटवून दिले. यानंतर शिक्षण व जागतिक संबंध, शिक्षण व सामाजिक सुधारणा, शिक्षण व आदिवासी सुधारणा असे अनेक महत्त्वाचे मुद्दे आपल्या भाषणात स्पष्ट केले.
प्रा. बुरगुटे सर यांच्या या यशाबद्दल त्यांचे वडील – श्री. अण्णासाहेब बुरगुटे, आई – सौ. फुलाबाई बुरगुटे, वहीनी दैवशाला व भाऊ – नारायण बुरगुटे तसेच पत्नी – सोनाली बुरगुटे यांच्यासह अन्य नातेवाईकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसेच कृषि महाविद्यालय, आळणी-गडपाटी येथील प्राचार्य, शिक्षकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह सर्व विद्यार्थ्यांनी प्रा. बुरगुटे सरांच्या या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रघुनाथ परक्कल (नायजेरिया) तसेच डॉ. उलएस्सेस के. यु. (फिलिपाईन्स) उपस्थित होते. या पुरस्काराचे स्वरूप -मेडल, ट्रॉफी, प्रमाणपत्र, १५०० रु. रोख रक्कम व लाईफटाइम मेंबरशिप असे यावेळी प्रा. बुरगुटे सर यांना मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले.