21.9 C
Solapur
February 22, 2024
तुळजापूर

तुळजापूर येथे कोरोना लसीकरण शुभारंभ ; डॉ दिनार उपासे यांना दिली पहिली लस.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले
विभागीय संपादक-मराठवाडा

तुळजापूर :- आज दि 16 रोजी तुळजापूर शहरातील ग्रामीण रुग्णालय येथे कोरोना लसीकरण सुरवात करण्यात आली. या लसीचा पहिला डोस डॉ दिनार उपासे यांना देण्यात आला. तत्पूर्वी या प्रसंगी कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीचे प्रतिमा पूजन करण्यात आले.

यावेळी प्रमुख उपस्थिती नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या हस्ते सदरील लसीकरणाचे उद्दघाटन करण्यात आले उपस्थित डॉ चंचल बोडके, समाजसेवक आनंद कंदले, डॉ. प्रवीण रोचकरी, डॉ दिग्विजय कुतवळ, श्रीधर जाधव, डॉ चंद्रकांत क्षीरसागर, डॉ गडीकर म्याडम, डॉ सुहास पवार, स्टाफ प्रमुख भोसले मॅडम, व सर्व कर्मचारी उपस्थित होते..

Related posts