साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले
विभागीय संपादक-मराठवाडा
जिल्हा शासकीय रुग्णालय, धाराशिव(उस्मानाबाद) येथे आज कोविड-१९ विषाणू प्रतिबंधात्मक लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. त्याचप्रमाणे पहिल्या टप्प्यातील प्राधान्य गटातील आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली.
याप्रसंगी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जि.प.अध्यक्षा सौ. अस्मिता कांबळे, नगराध्यक्ष नंदूभैय्या राजेनिंबाळकर, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.डि.के.पाटील, डॉ.सचिन देशमुख, जि.प.आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे, नगसेवक बाळासाहेब काकडे, प्रविण कोकाटे, भिमा (आण्णा) जाधव, जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आदी उपस्थित होते.