कापूर म्हणजे नेमकं काय? कुठुन येतो कापुर?
प्रा. सगंमेश्वर सुरेश केदार
अजूनही 60-70% लोकांना माहीतच नाही की कापूर हा झाडाला येतो. हा डिंक ही असतो आणि बाष्पीभवन प्रक्रियेतून सुद्धा मिळवता येतो. जो डिंक प्रकार असतो तो बाष्पीभवनाचा प्रक्रियेपेक्षा कमी शुद्ध असतो. कापूर मूलतः आशिया खंडातली वनस्पती आहे जी भारतासह जपान, चीन, जावा, सुमात्रा बेटे आणि इंडोनेशिया इथे मुबलक प्रमाणात मिळत असे. भारत हा कापूराचा उद्गाता म्हणुन ओळखला जातो. वैद्यगुरु धन्वंतरी आणि ऋषी चरकांनी सर्वप्रथम कापूर हा औषधींमध्ये वापरला आणि नंतर तो घरोघरी त्याचा वापर सुरु झाला.
*आज आपल्याला कापुर भारतात आढळत का नाही?*
त्याचे मुख्य कारण आहे परकीय आक्रमणे आणि सोबतच त्यांनी आणलेले शोभेची झाडे जशी गुलमोहर आणि निलगिरी (हे दोन्ही झाडे दलदलीच्या प्रदेशातली आणि ह्यांचा उपयोग दलदलीची जमीन सुपीक करणे होय)इंग्रजांना निळ रबर आणि चहासाठी बागायती जमिनी तयार करून घ्यायचे काम ह्या झाडांनी केले आणि आपण भारतीय कुणाचीही कॉपी करायला सर्वात पुढे हे वेगळे सांगायला नकोच (माफी असावी पण हे सत्य आहे) तर आपणही ते सुरू केले आणि महाकाय झाडे जशी कापूर, वड आणि पिंपळ ह्यांची कत्तल सुरु केली आणि त्यातूनच कापूर नामशेष झाला. तरी जपान, सुदान, जावा, सुमात्रा आणि इंडोनेशिया ह्या देशांनी मात्र कापूर जोपासला आणि आज आपण बघतो तिथले वातावरण आपल्यापेक्षा कित्येक पटीने शुद्ध आणि व्हायरस मुक्त आहे.कापूर ज्याचे वैज्ञानिक नाव *Cinnamomum Camphora* असे आहे. त्यालाच Camphor Tree, Camphor Laure, Camphortree, Japanese Camphor, Chinese Sassafras Tree ह्या नावांनी देखील ओळखले जाते.
कापूर हा सदाहरित (बारा महिने हिरवा असणारा वृक्ष) वृक्षांमधून एक आहे आणि संबंध बुंधा त्याचा एकत्र असतो. ज्याची सरासरी उंची 12 ते 15 मीटर असते (म्हणजे साधारणतः 30 ते 40 फूट) आणि घेरा 3 ते 4 फुटांचा असतो. कापूराचा इतका अवाढव्य पसारा आहे (म्हणून मी तुम्हाला सांगतो की त्यासाठी जागा खूप हवी. तुम्ही हे झाड कुंडीत किंवा गच्चीवरच्या बागेत लावू शकत नाही) अतिशय झटपट वाढणारा हा वृक्ष दोन ते अडीच वर्षात पूर्ण वाढतो. एप्रिल-मे हा त्याच्या हंगाम असतो, जेव्हा त्याला फुले लागायला सुरवात होते आणि हिवाळ्यात फलोत्पादन ते सुद्धा कापुराचा आयुष्याच्या दुसऱ्या टप्प्यात (म्हणजेच 7 वर्षानंतर) सुरु होते.
*आता आपण बघुयात कापुर साठी लागणारी भौगोलिक परिस्थिती*
पाण्याचा व्यवस्थित निचरा होणारी जमीन तसेच थोड्या प्रमाणात क्षारयुक्त जमीन ही कापूर लागवडीसाठी योग्य जमीन असते. सुरूवातीचे काही दिवस कापराची व्यवस्थित निगा घ्यावी लागते नंतर निगा राखण्याची तितकीशी गरज नसते. कापूर वृक्षाचे वय हा एक शोधाचा विषय आहे. त्याचे सरासरी वय जरी मानवाइतके असले तरी जगाच्या पाठीवर हजारो वर्षे जुने कापूर झाड सुद्धा आहे. त्यातले एक झाड जपान इथे असून त्याचे वय सध्या 1500 वर्षे आहे. ज्याला जपानी लोकांनी *The Great Capmhor of Kamo* हे नाव सुद्धा दिले आहे.
माझ्या असेही वाचनात आले की ‘कापूर हा ज्वालाग्राही असल्यामुळे झाड लवकर पेट घेते’ मला सुरवातीला हसू आले पण असो. महितीअभावी खूप काही अफवा कापराबद्दल प्रसिद्ध आहेत. पण मी इथे सांगू इच्छितो की, कापुर ज्वालाग्राही आहे परंतु त्याला कमीतकमी 48℃ इतके तापमान लागते. पेट घ्यायला आणि कापराला कमी तापमान सहन होत नाही म्हणजेच उणे 3℃ ते उणे 4℃ मध्ये त्याची लागवड होत नाही.
कापुराचे फळ हे. गडद काळ्या रंगाचे जे प्रजनन उत्पत्ती नंतर यायला सुरुवात होते. उंच आणि दाट फांदी तसेच पानांमुळे कापुर हा सावली देण्यात उत्तम असा वृक्ष आहे. तुम्ही कधीही कापूराचा झाडाखाली जाऊन बसा तुम्हाला प्रसन्नच वाटेल. सदाहरित असल्यामुळे कापूर हा तुळशीच्या खालोखाल ऑक्सिजन देणारा आणि वादळात सुद्धा मजबूत असा वृक्ष आहे.
ही आहे कापराची माहिती जी योग्य वाटली ती मी दिली. जी गरजेची नव्हती ती गाळली आता आपण त्याचे उपयोग बघुयात.
जसे मी वरती बोललो आयुर्वेदात कापूराचे भरपूर उपयोग आहेत. भरपूर असे प्रसंग आहेत, जिथे आपल्याला कापूराचा उल्लेख आढळतो. आजच्या आयुष्यात सुद्धा तांबूल बनवताना किंवा तिरुपती बालाजीच्या प्रसादाच्या लाडवात ह्या कापुराचा उपयोग होतो.
कापुर हा उत्तम नैसर्गिक वेदनाशामक तसेच भुलीसाठी वापरण्यात येणारा पदार्थ असुन कापूर तुम्हाला तुमच्या बऱ्याच श्वसनाच्या आजारात फायदेशीर आहे. त्याचे कारण म्हणजे कापूरातून मिळणारा ऑक्सिजन जर तुमचा श्वास भरून येत असेल अथवा दमा झाला असेल तर कापूर हा संजीवनी आहे. त्यासोबतच कापूराचा उल्लेख 9 मृतसंजीवनीमध्ये केला जातो. जे माणसाचे आयुष्य वाचवायचे साहस ठेवतात. असा हा कापूर सर्दी, खोकला, दमा, विषप्रयोग, निद्रानाश वेदनाशामक आणि अश्या बऱ्याच गोष्टींमध्ये उपयोगी आहे आणि सध्या त्याचा उपयोग अरोमा थेरपीमध्येसुद्धा सुरु केला आहे.
कापुराचे खोड मजबुत तसेच टिकाऊ असते त्यामुळे कापूराच्या लाकडाचा उपयोग घर बनवण्यासाठी सुद्धा होतो. तसेच कापूर तेलाचा उपयोग आपल्या वेगवेगळ्या सौंदर्यप्रसाधने तसेच मेडिकल सेक्टर मध्ये सुद्धा केला जातो आणि जपानमध्ये तर ते साबणामध्ये सुद्धा याचा वापर करतात.
आता ह्याचे नुकसान आणि ह्याला कुठे लावावे याबद्दल थोडे बोलूयात तर कापूर हा आकाराने अवाढव्य असल्यामुळे घराच्या शेजारी अथवा कॉलोनीमध्ये अथवा आपल्या अपार्टमेंटमध्ये अथवा गच्चीवर कुंडीत लावता येत नाही. त्याची मुळे पार 20 ते 30 फुटांपर्यंत वाढत जाऊन 100 ते 200 फुटांपर्यंत जाऊ शकतात. त्यामुळे तुमच्या घराला नुकसान होऊ शकते. तसेच याची अति उंची तुम्हाला मिळणाऱ्या सुर्यप्रकाशामध्ये अडथळा निर्माण करतो. कापूराचा सहभाग सिडेटिव्ह ड्रगमध्ये होतो म्हणून याचा प्रत्यक्ष उपयोग टाळायला हवा. जर तो अति झाला तर तुम्हाला विषबाधा होऊ शकते. तर कापूर हा आपण कुठे लावावा याचे उत्तर अगदी सोपे आहे. डोंगर, सार्वजनिक बागा, शेत इथे आपण याची लागवड करू शकतो. शेतकऱ्यांसाठी हा एकदम चांगला जोडधंदा आहे. परंतु एक आहे… मित्रानो, एक कापूराचे झाड कमीतकमी अर्धा किलोमीटरचा परिसर शुद्ध ठेवतो आणि एक झाड आजूबाजूला असेल तर छोटे मोठे किडे कीटक, डास, मुंग्या आणि उंदीर लांब राहतात आणि तुम्हाला नवचैतन्य देतो.
तर असा हा बहुगुणी कापूर हा सदाहरित वृक्ष आणि निसर्गाची मदत करणारा सध्या झपाट्याने कमी होतोय. कारण एकच मानवी हस्तक्षेप… याला आपण थांबवायला हवे.
संग्राहक
दिनेश राजेश कोल्हारे
राहणार संभाजीनगर औरंगाबाद
7620675754
मागील 6 वर्षांपासून ह्यावर मी शोधकार्य करतोय
आणि आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात 1000 वृक्षांची लागवड करायची आहे
प्रा. सगंमेश्वर सुरेश केदार
8830355349