उस्मानाबाद 

जिल्ह्याचे यापूर्वी नेतृत्व करणाऱ्यांना बारामती सारखा जिल्ह्याचा विकास का करता आला नाही ? प्रथमतः याचे उत्तर जनतेला द्यावे मग शहाणपणा आम्हाला शिकवावे. – खा. ओमराजे निंबाळकर

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले,
विभागीय संपादक-मराठवाडा.

धाराशिव (उस्मानाबाद) – सांजा ता.धाराशिव (उस्मानाबाद) येथे ग्रामीण विकास कार्यक्रम (2515) योजने अंतर्गत यशवंत नगर गणपती मंदिर समोरील रस्ता, ज्ञानेश्वर कॉलनी येथिल ओम सूर्यवंशी यांच्या घरा जवळ सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाचे उद्घाघाटन तसेच खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या स्थानिक खासदार निधीमधून सिद्धार्थ नगर भागातील (बुद्धविहार) समाजमंदिराचे लोकार्पण लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ.कैलास घाडगे-पाटील, नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदूभैय्या राजेनिंबाळकर, तालुकाप्रमुख सतिषकुमार सोमाणी आदी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.

प्रथमतः गावाच्या नवनिर्वाचित सरपंच संताजी पवार, उपसरपंच सतिष बप्पा सुर्यवंशी, दक्षता समितीचे राकेश सुर्यवंशी, ग्रा.पं. सदस्य श्रीमती सुनंदा हरिभाऊ कचरे, शोभा शंकर गुंडे, पुष्पा भागवत बळी, मनिषा अनिल सुर्यवंशी, ललिता चांदणे, तांबोळी अमीना, शांताबाई सुर्यवंशी, नामदेव राठोड, प्रविण जकाते आदींचा सत्कार करून पुढिल सामाजिक कार्यास  खासदार, आमदार यांनी शुभेच्छा दिल्या.


गावच्या नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा आ. कैलास पाटील व खा. ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मा.खासदार साहेब यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आपण स्थानिक खासदार निधी मधून जिल्हा रुग्णालयास एक रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. तसेच महाराष्ट्र राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी मिळालेल्या अत्याधुनिक रुग्णवाहिका शिवसेना संपर्क कार्यालयास सुपूर्द केली आहे. सदरील रुग्णवाहिका आयसीयू, व्हेंटिलेटर व ऑक्सिजनयुक्त सुविधांनी सुसज्ज असून नक्कीच या रुग्णवाहिकेंचा फायदा जिल्ह्यातील नागरिकांना वेळेवर उपचारासाठी उपलब्ध होईल.

आपल्या आमदार साहेबांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट पिक विमा मिळावा यासाठी विधानसभेत मुद्दा मांडला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन खा. ओमराजे निंबाळकर यांनी केले व आभार मानले.

यावेळी खा. ओमराजे निंबाळकर बोलताना म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री मा.ना उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार आल्या पासून राज्यात शेतकरी, गोरगरिब, सर्व सामान्य नागरिकांची कामे सरकार करत आहेत. यातच राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने आपले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुर करून आपले स्वप्न पूर्ण केले आहे. तसेच मराठवाड्यासह  जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासास चालना देण्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गतच्या प्राध्यानक्रमाची मर्यादा वाढवून कळंब तालुक्यातील दुधाळवाडी व रामदारा साठवण तलावापर्यंतची कामे यामध्ये समाविष्ट केले आहेत. येत्या 2023 पर्यंत 7 टी एम सी.पाणी दुधाळवाडी व रामदारा साठवण तलावात येणार आहे ते आपणांस पहावयास मिळेल. अशा प्रकारे महाविकास आघाडीचे सरकार काम करत आहे. व अशी जिल्ह्यातील प्रलंबित कामे करत राहणार आहे. असे आश्वासन यावेळी खा. ओमराजे निंबाळकर यांनी बोलताना दिले.

यावेळी बोलताना मा. खा. ओमराजे निंबाळकर यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत म्हणाले की, विरोधक बारामतीचे मेडिकल कॉलेज पाहण्यास गेले व त्या धर्तीवर करण्यास निघालेत. परंतु आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी बारामती तालुका असताना जो विकास केला midc विकसित केली, शासकीय कार्यालये  बारामतीत आणली व विविध प्रकारे विकास केला. मग आपण तर त्यावेळेस जिल्ह्याचे नेते होतात व पवार साहेबांच्या मांडीला मांडी लावून होता मग त्यांनी तेथे जो विकास केला तो आज उस्मानाबाद जिल्ह्याचा का दिसत नाही याची उत्तरे जनतेला द्यावी मग शहाणपणा आम्हाला शिकवा. असा विरोधकांचा समाचार घेतला.

याप्रसंगी खा. ओमराजे निंबाळकर, जिल्हाप्रमुख तथा. आ. कैलास पाटील, नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदूभैय्या राजेनिंबाळकर, उपजिल्हाप्रमुख विजय बापू सस्ते, शिवसेना तालुकाप्रमुख सतिषकुमार सोमाणी, माजी ग्रा.पं. सदस्य गफूरभाई काझी, हनुमंत सूर्यवंशी, अनिल सुर्यवंशी  मोहन काका सुर्यवंशी, तंटामुक्ती अध्यक्ष अरविंद सुर्यवंशी, तंटामुक्ती उपाध्यक्ष नितीन टेलर, श्रीकांत आबा सूर्यवंशी, सुरेश सुर्यवंशी, अमर शिंदे , गोटू सुर्यवंशी, अरुण काळे, आरिफ तांबोळी, योगेश सुर्यवंशी, महेश कचरे, धावारे आबा, नितीन मगर, गुड्डे सर, फुलचंद गायकवाड, गावचे शाखा प्रमुख, गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

विरोधक बारामतीचे मेडिकल कॉलेज पाहण्यास गेले व त्या धर्तीवर करण्यास निघालेत. परंतु आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी बारामती तालुका असताना जो विकास केला midc विकसित केली, शासकीय कार्यालये  बारामतीत आणली व विविध प्रकारे विकास केला. मग आपण तर त्यावेळेस जिल्ह्याचे नेते होतात व पवार साहेबांच्या मांडीला मांडी लावून होता मग त्यांनी तेथे जो विकास केला तो आज उस्मानाबाद जिल्ह्याचा का दिसत नाही याची उत्तरे जनतेला द्यावी मग शहाणपणा आम्हाला शिकवा.
खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर (धाराशिव लोकसभा)

Related posts