तुळजापूर – लोहगाव, ता. तुळजापूर येथे शिवसेनेच्या वतीने मोठ्या उत्साहाने राजमाता जिजाऊ माँ साहेब यांची जयंती साजरी करण्यात आली. राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मा.जनार्धन दबडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मा.सरपंच रविंद्र दबडे, मा.सरपंच सुनिल बनसोडे, रघुनाथ दबडे, काशिनाथ मारेकर, अक्षय मारेकर, विजय जाधव, महादेव काटकर, प्रताप सोमवंशी अरविंद दबडे यांच्यासह इतर सर्वजण उपस्थित होते.