पंढरपूर : पंढरपूर विधानसभा पोट निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी आज झाली. यामध्ये 38 उमेदवारंपैकी पैकी आठ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.
अर्ज छाननी प्रक्रीयेवेळी निवडणूक निरिक्षक दिब्य प्रकाश गिरी उपस्थित होते.
पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी एकूण 38 उमेदवारांनी 44 नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. त्यापैकी 30 उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले. उमेदवारी अर्जांची छाननीत शितल शिवाजी आसबे, सिध्दाराम सोमाण्णा काकणकी यांचे वय कमी असल्याने अर्ज अवैध ठरविण्यात आला. बळीराम जालिंदर बनसोडे, किशोर सिताराम जाधव , सुधाकर रामदास बंदपट्टे यांनी अनामत रक्कम कमी भरल्याने व गणेश शिवाजी लोखंडे यांनी अनामत रक्कम न भरल्यामुळे अर्ज अवैध ठरविण्यात आला. मतदार संघाबाहेरील सूचक असल्याने सतिश विठ्ठल जगताप यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. तसेच पोपट हरी धुमाळ या उमेदवाराचा अर्ज मान्यता प्राप्त पक्ष नसल्याने व एकच सूचक दिल्याने उमेदवारी अर्ज अवैध ठरवला आहे.
पंढरपूर विधानसभा मतदार संघासाठी भगिरथ भारत भालके (नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी), समाधान महादेव आवताडे (भारतीय जनता पार्टी), शैला धनंजय गोडसे (बहुजन विकास आघाडी), सचिन अरुण शिंदे (स्वाभिमानी पक्ष), संजय नागनाथ माने (महाराष्ट्र विकास आघाडी), महेंद्र काशिनाथ जाधव (पिपल्स रिपब्लिकन पार्टी), राजाराम कोडींबा भोसले (बळीराजा पार्टी), सिध्देश्वर भारत आवारे (बहुजन महापार्टी) बिराप्पा मधुकर मोटे (वंचित बहुजन आघाडी) तसेच अपक्ष म्हणून संतोष महादेव माने, संदीप जनार्दन खरात, नागेश प्रकाश पवार, नागेश आण्णासो भोसले, इलियास हाजीयुसूफ शेख, रज्जाक उर्फ अब्दुलरोफ जाफर मुलाणी, संजय चरणू पाटील, अशोक ज्ञानदेव वाघमोडे,अभिजीत वामनराव आवाडे-बिचकुले, अमोल अभिमन्यू माने, सुनिल सुरेश गोरे, सिताराम मारुती सोनवले, सिध्देश्वर बबन आवताडे, मोहन नागनाथ हळणवर, रामचंद्र नागनाथ सलगर, सुदर्शन रायचंद खंदारे, कपिलदेव शंकर कोळी, सुदर्शन पांडूरंग मसुरे,मनोज गोविंदराव पुजारी, बापू दादा मेटकरी, बिरुदेव सुखदेव पापरे या उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गुरव यांनी यावेळी दिली.
यावेळी भगिरथ भारत भालके व समाधान महादेव आवताडे यांच्या उमेदवारी अर्जावर हरकती घेण्यात आल्या होत्या निवडणूक निर्णय अधिकारी गुरव हरकती फेटाळून अर्ज वैध ठरविण्यात आले. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुशिल बेल्हेकर, स्वप्निल रावडे उपस्थित होते .
उमेदवारी अर्जांची छाननी प्रसंगी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाचे काटेकोपणे पालन करण्यात आले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 3 एप्रिल 2021 रोजी पर्यंत असल्याचेही श्री. गुरव यांनी यावेळी सांगितले.