पुरुषोत्तम विष्णू बेले,
धाराशिव जिल्हा प्रतिनिधी.
आज भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून पिंपळा (बु.) येथील ग्रामपंचायत कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
“शिका, संघटित व्हा, संघर्ष करा !” हा मूलमंत्र देऊन आपणा सर्वांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे, विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंती उत्सवानिमित्त आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख श्री. जगन्नाथ मनोहर गवळी-भोसले यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याबद्दल माहिती सांगण्यात आली. यावेळी तोंडाला मास्क बांधत आरोग्याची काळजी घेत शासकीय नियमांचे पालन करण्यात आले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी, सरपंच सौ. गीता वाघमोडे, सुधाकर वाघमोडे, उपसरपंच विजयकुमार जाधव, ग्रा. पं. सदस्य बाळू सिरसट, सोमनाथ मोरे, संग्राम राजेपांढरे, युवा नेते बालाजी खराबे, बालाजी चुंगे, संगणक ऑपरेटर एकनाथ जाधव, भीमा जाधव, यांच्यासह ग्रा. पं. कर्मचारी संजय डोलरे उपस्थित होते.