26.2 C
Solapur
September 21, 2023
तुळजापूर

अश्विनी पौर्णिमेनिमित्त सलग 21 व्या वर्षीही महाप्रसाद अन्नदान वाटप

साईनाथ गवळी,
तुळजापूर/उस्मानाबाद प्रतिनिधी.

ओम साई माऊली ट्रस्ट तुळजापूर व मुंबई यांच्यावतीने सलग 21 व्या वर्षीही देवी भाविकांसाठी महाप्रसाद रुपी अन्नदान वाटप करण्यात आले. कोविडच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर शहरात देवी भाविकांना बंदी असल्याने प्रतिवर्ष घाटशीळ पायथ्याशी होणारा अन्नदान कार्यक्रम यावर्षी अत्यंत साधेपणाने व मोजक्याच कार्यकर्त्यांसमवेत भवानी रोडवर घेण्यात आला. महाप्रसाद अन्नदानात खंड पडुन नये म्हणून ट्रस्टचे पदाधिकारी चंद्रकांत पप्पू काळे यांनी यावर्षी तुळजाभवानीच्या सेवेत जे शहरात पोलीस व सुरक्षा कर्मचारी बंदोबस्ताला आले आहेत तसेच शहरात सफाई करणारे कर्मचारी या सर्वांना जागेवर वरण, मसाला भात व शिरा हा प्रसाद पोच केला व आपली अन्नदानाची सेवा अखंड ठेवली. याकामी विपुल काळे, कुमार इंगळे, दत्ता गवळी, गौतम रोचकरी, संजय केवडकर, आनंद कंदले, सतीश पवार व जाधव परिवार यांनी सहकार्य केले. यासाठी संपूर्णपणे सोशल डिस्टन चे पालन करण्यात आले होते.

Related posts