सचिन झाडे –
पंढरपूर, (प्रतिनिधी)
दि.22 सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्यास चालु गळीत हंगामात गळीतास आलेल्या ऊसाचा पहिला हप्ता प्रती टन.2000/- व सन 2018-19 मधील उर्वरीत एफआरपीची रक्कम तसेच सिताराम महाराज साखर कारखाना सन 2018-2019 मधील ऊस बीलाच्या पोटी प्रती मे.टन. रु.500/- प्रमाणे निशिगंधा सहकारी बँक पंढरपूर येथे गटवार ऊस बीलाचे वाटप सुरु आहे. अशी माहिती सहकार शिरोमणीचे चेअरमन तथा सिताराम महाराज साखर कारखान्याचे मार्गदर्शक कल्याणराव काळे यांनी दिली.
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम 2020-21 मधील ऊस उत्पादक शेतकज्यांचा दि.17/11/2020 ते 30/11/2020 या पंधरवडा मध्ये गळीतास आलेल्या ऊसास पहिला हप्ता प्रती मे.टन.रु.2000/- प्रमाणे सुरु असून गळीत हंगाम 2018-19 मधील शेतकज्यांची उर्वरीत एफआरपी रक्कम ही दि.24/12/2020 पासून पंढरपूर येथील निशिगंधा सहकारी बँकेतून गटवाईज वाटप करण्यात येणार आहे. तसेच ऊस तोडणी वाहतुकीचे बीले कमिशनसह प्रतिभादेवी नागरी सहकारी पतसंस्था पंढरपूर येथे गट वाईज सुरु करण्यात आलेले आहेत. सिताराम महाराज साखर कारखाना खर्डी चे सन 2018-19 मधील ऊस बीलाच्या एफआरपी पोटी प्रती मे.टन रु.500/- प्रमाणे सोमवार दि.21/12/2020 रोजी गटवाईज पंढरपूर येथील निशिगंधा सहकारी बँक येथे वाटप सुरु करण्यात आले असल्याचे सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी सांगीतले.
सहकार शिरोमणी व सिताराम महाराज साखर कारखान्याच्या ऊस उत्पादकांना आपल्या गटानूसार बीलाचे वाटप करण्यात येणार असून बँकेत कोरोनाच्या पाश्र्वभुमीवर जास्त गर्दी होवू नये म्हणून कारखान्याच्या शेती विभागामार्फत संबंधीत शेतकज्यांना ऊस बीला संदर्भात निरोप दिल्यानंतरच बँकेत जावे असे आवाहन काळे यांनी केले आहे.