महाराष्ट्र

१ मे पासून १८ वर्षावरील सर्वाचं लसीकरण करण्याची केंद्राची परवानगी,लसीकरणाबत केंद्र सरकारची मोठी घोषणा..

1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांच लसीकरण करण्याची केंद्राची परवानगी
वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने राज्यात 15 दिवसां
येत्या १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. दुसरीकडे देशात कोरोना महारोगराईन थैमान घातला आहे. रविवारी दिवसभरात १ हजार ६१९ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतले. महाराष्ट्रासह सर्वच राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या एका दिवसात २ लाख ७३ हजार ८१० रूग्णांची भर पडली. १ लाख ४४ हजार १७८ रूग्ण कोरोनामुक्‍त झाले.

देशातील एकूण कोरोनारूग्णांची संख्या त्यामुळे १ कोटी ५० लाख ६१ हजार ९१९ झाली आहे. यातील १ कोटी २९ लाख ५३ हजार ८२१ रूग्णांनी कोरोनावर मात मिळवली आहे. तर, १९ लाख २९ हजार ३२९ (१२.८१%) रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत १ लाख ७८ हजार ७६९ रूग्णांचा (१.१९%) कोरोनाने बळी घेतला आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असताना लसीकरणाचाही वेग कायम ठेवण्यात आला आहे. देशात आतापर्यंत १२ कोटी २६ लाख २२ हजार ५९० लसीचे डोज दिले आहेत. रविवारी २६ लाख ८४ हजार ९५६ डोज देण्‍यात आले. कोरोना तपासण्यांचा वेगही वाढवण्यात आला आहे. देशात आतापर्यंत २६ कोटी ७८ लाख ९४ हजार ५४९ कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील १३ लाख ५६ हजार १३३ तपासण्या रविवारी करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.ची संचारबंदी लागू केली. परंतु तरीही राज्यात कोरोनाचा प्रकोप थांबायचं नाव घेत नाही

Related posts