करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने राजधानी दिल्लीत लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत सहा दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली आहे. अरविंद केजरीवाल यांनी राज्यातील जनतेला संबोधित करताना लॉकडाउन लावत असल्याची माहिती दिली. सोमवारी रात्री १० पासून लॉकडाउनच्या अमलबजावणीला सुरुवात होणार आहे. दरम्यान यावेळी अरविंज केजरीवाल यांनी कोणीही दिल्ली सोडून जाऊ नका असं आवाहन केलं.
