24.2 C
Solapur
September 26, 2023
अक्कलकोट

हन्नुर येथे राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुले यांची जयंती साजरी

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) – स्त्री शिक्षणाचे कट्टर पुरस्कर्ते व बहुजन उद्धारक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती हन्नूर येथे ग्रामपंचायत व नेहरू युवा केंद्र लॉर्ड बुद्धा प्रतिष्ठान यांच्या वतीने साजरी करण्यात आली.ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात सामाजिक कार्यकर्ते रूद्राप्पा भरमशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. तर नेहरू युवा केंद्र कार्यालयातील माजी ग्रामपंचायत सदस्य मिलिंद बालशंकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ज्येष्ठ नेते सिद्धेश्वर कल्याणशेट्टी उपसरपंच सागर कल्याणशेट्टी माजी उपसरपंच शरणाप्पा हेगडे, ग्रामपंचायत सदस्य प्रा गौतम बाळशंकर, माजी सरपंच निलेश बाळशंकर ग्रामपंचायत सदस्य परमेश्वर फसगे, गिरमल पाटील जेष्ठ नेते सोपान निक्ते अनिल तलवार जेष्ठ नेते शिवाप्पा भरमशेट्टी मनोज बाळ शंकर लॉर्ड बुद्धा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष संतोष बाळशंकर तुळसिराम ईरवाडकर अजय दुपारगुडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related posts