उस्मानाबाद 

चिकुंद्रा येथे क्रांतिज्योती महात्मा फुले यांची जयंती साजरी…

पुरूषोत्तम विष्णु बेले/उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी

थोर समाजसुधारक, मराठी लेखक ज्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून उपेक्षित, गोरगरीब,अस्पृश्य , समाजातील लोकांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली, स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली १८८८ च्या सुमारास मुंबई च्या जनतेने त्यांना महात्मा ही पदवी बहाल केली.

फुले ,शाहू, आंबेडकर, यांचा वारसा या देशास लाभला अशा या महामानवाची जयंती चिकुंद्रा ग्रामपंचायत कार्यालय मध्ये करण्यात आली. यावेळी चिकुंद्रा गावचे विद्यमान सरपंच राणबा जाधवर, जेष्ठ शिवसैनिक माधव मोटे, एकनाथ मोटे, पत्रकार पुरूषोत्तम बेले, कुशल गरड, सौदागर गायकवाड आदि जण उपस्थित होते.

Related posts