पंढरपूर

स्वेरीमध्ये ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ यांची १८९ वी जयंती साजरी

सचिन झाडे
पंढरपूर: –

गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये
‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ यांची १८९ वी जयंती साजरी करण्यात आली.

प्रारंभी सांस्कृतीक कार्यक्रम विभागप्रमुख प्रा. करण पाटील यांनी प्रास्ताविक करून जयंती संबंधित माहिती दिली. यावेळी
स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या हस्ते ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ यांच्या
प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे म्हणाले की ‘ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाच्या बाबतीत मोलाचे कार्य करून समाजाला योग्य दिशा दिली. स्वेरीच्या विद्यार्थिनींनी त्यांचा आदर्श घेऊन रोल मॉडेल बनावे, तसेच मुलींनी आज स्वतः सक्षम होणे गरजेचे असून त्यांनी सर्व क्षेत्रात पुढे यावे. शिक्षण हे समाजाला जागे करण्याचे साधन असून, स्त्रियांना त्याची जास्त आवश्यकता आहे.
हे ओळखून सावित्रीबाईंनी मुलींच्या शिक्षणासाठी खूप कष्ट घेतले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वेरीच्या सर्व महाविद्यालयांना सुट्टी असून हा कार्यक्रम स्वेरीच्या मुख्य इमारतीच्या पोर्च मध्ये साजरा करण्यात आला.
तर अभियांत्रिकी व फार्मसीच्या पदवी व पदविकांच्या प्रत्त्येक विभागात गुगल मीटच्या साहाय्याने विद्यार्थी अधिष्ठाता डॉ.अभय उत्पात, सर्व विभागप्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन कार्यक्रम घेतला तर त्यात दोन,तीन विद्यार्थीनी प्रतिनिधींनी क्रांतिज्योती सवित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.

यावेळी कॅम्पस इन्चार्ज प्रा.एम.एम.पवार, प्रा. स्नेहल चाकोरकर, प्रा. दिपाली वाघ, प्रा. संजीवनी कदम, प्रा. प्रिया लोकरे, प्रा. नितल दांडगे,
प्रा. पंकज गायकवाड, इतर प्राध्यापक वर्ग, ज्योती मोरे, बालाजी सुरवसे, अमोल चंदनशिवे, कुंडलिक पालकर, संतोष माने आदी उपस्थित होते.

Related posts