hacklink hack forum hacklink film izle hacklink lunchtime resultsGrandpashabetjojobetgrandpashabethepbet girisjojobet girişjojobetjojobetgrandpashabet
महाराष्ट्र

14 एप्रिलला अनिल देशमुखांच्या सीबीआय चौकशीची शक्यता

मुंबई : कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सीबीआयने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना समन्स बजावले आहे, अशी माहिती एएनआय वृत्तसंस्थेनं दिली आहे. 14 एप्रिल रोजी अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी होण्याची शक्यता आहे. 100 कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपांप्रकरणी हायकोर्टाने सीबीआयला 15 दिवसात प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

सीबीआय अधिकारी काल (11 एप्रिल) सचिन वाझे यांच्या दोन चालकांना DRDO मध्ये घेऊन आले होते. तर अनिल देशमुख यांचे खासगी सचिव एस कुंदन आणि संजीव पालांडे यांना बोलावण्यात आलं होतं. या सगळ्यांची 8 ते 10 तास चौकशी करण्यात आली. याआधी अँटिलिया स्फोटक प्रकरणी एनआयएच्या ताब्यात असलेले सचिन वाझे, महेश शेट्टी बार मालकासह मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह, तक्रारदार अॅडव्होकेट जयश्री पाटील यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे.

Related posts