कविता 

पाटी–पेन्सिल

आला आला जमाना
मोबाईल लॅपटॉपचा
इंटरनेट फेसबुकचा
तरी त्याचा मूळ पाया
पाटी पेन्सिलचा
पाटी-पेन्सिल नेच घडवले
ज्ञानी गुणवान तत्त्वज्ञानी व शास्त्रज्ञ पाटी-पेन्सिल नेच आपण सर्वांनी केला
श्रीगणेशा अ आ इ ई चा
गाईड नावाचे गाईड
नव्हते तेंव्हा पुस्तकांचा मेळ
बसत नव्हता जेंव्हा पाटी-पेन्सिलचा

फक्त आधार होता
आपल्या जीवनाला वळण ,
दिशा ,संस्कार पाटी ने दिले लाख मोलाचे शब्द
पाटी-पेन्सिल नेच शिकवले
पाटी पेन्सिल ही
सरस्वती माताच तू
ज्यानी आयुष्य माझे
घडविले खरी गुरु माताच तू !
🙏🏻🙏🏻
कवि:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव
सहशिक्षक श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद

Related posts