अक्कलकोट ( प्रतिनिधी ) –
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने जिल्हा वार्षिक योजना २०२०-२१ च्या योजनेतून जीर्ण झालेल्या अंगणवाडी नवीन बांधकामासाठी व दुरूस्ती करिता दोन कोटी एक लाख रुपये इतका निधी मंजूर झाल्याची माहिती सभापती स्वाती शटगार यांनी दिली. शुक्रवारी पंचायत समिती येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
एकात्मिक विकास योजनेतून लहान मुले शिक्षण घेत आहेत. पण अनेक गावातील इमारती या तात्पुरत्या स्वरुपात होत्या आणि त्याची अवस्था जीर्ण झालेली होती तर काही अंगणवाडी इमारत या नादुरुस्त अवस्थेत होत्या. पावसाळयात या इमारतींचा शाळा भरविण्यात त्रास होत होता.याचा विचार करून माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या वतीने पालकमंत्री दतात्रय भरणे यांच्या मार्फत जिल्हा नियोजन समिती कडे शिफारस केली होती. दहिटणे, चप्पळगांव, काळेगांव, पितापुर, तोळणूर, कुरनुर, सोळसे तांडा, आंदेवाडी खु, आंदेवाडी ज, बोरोटी , हन्नुर, जेऊर, कडबगांव, समर्थनगर, धारसंग, तडवळ, हत्तीकणबस,शिरवळवाडी, सलगर दोन, नागणसुर दोन असे २२ नवीन अंगणवाडी इमारत मंजुर झाले आहे. त्याचप्रमाणे जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंगणवाडी केंद्र स्वमालकिची इमारत बांधकाम दुरुस्तीस प्रशासकिय मान्यता मिळाली त्यांना प्रत्येकी एक लाख रुपये इतका निधी मंजूर झाला आहे. या निधीमुळे पावसाळ्यापूर्वी इमारतींची सोय होणार आहे. २२ नवीन स्वतंत्र इमारत साठी १ कोटी ८७ लाख रूपये व व आठ वर्षापुर्वीच्या इमारत दुरूस्ती साठी प्रत्येकी एक लाख असे चौदा लाख रूपये असे एकुण २ कोटी एक लाख रूपयाचा निधी मिळविला आहे.मतदार संघातील सदस्यांचेही शिफारस यासाठी मिळालेले आहे.
तालुक्यातील सभापती असल्याने तालुक्याला जादा निधी मिळविण्यासाठी शटगार यांनी माजी आहे.या पत्रकार परिषदेस सभापती स्वाती शटगार,अक्कलकोट पंचायत समिती सभापती सुनंदा गायकवाड, माजी कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील, माजी उपसभापती सिद्धार्थ गायकवाड, अप्पाशा शटगार, माया जाधव, प्रवीण शटगार, विश्वनाथ हडलगी, रवीराज गायकवाड आदी उपस्थित होते.