महाराष्ट्र

मतदार यादीत तब्बल 11 लाख दुबार मतदार

महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादीवर विरोधी पक्षांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. या प्रश्नांना उत्तर देत प्रारुप मतदार यादीतील संभाव्य दुबार मतदारांची आकडेवारी समोर आली. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा (Election) प्रचार अंतिम टप्प्यात आला असून आता मुंबईसह (Mumbai) सर्वच महापालिका निवडणुकांचे वेध राजकीय नेत्यांना लागले आहेत. विशेष म्हणजे, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले असून आयोगाने 20 नोव्हेंबर रोजी प्रारुप मतदार यादी जाहीर केली. मात्र, या मतदार यादीत मोठा घोळ असल्याचे सांगत शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी आयोगाकडे तक्रारी केल्या आहेत. दुबार मतदार (Voter) हाही या याद्यांमधील महत्त्वाचा मुद्दा असून आता विरोधी पक्षांच्या आरोपानंतर दुबार मतदारांची आकडेवारी मुंबई महापालिकेकडून जारी करण्यात आली आहे. त्यानुसार, तब्बल 11 लाख दुबार मतदार असल्याचं समोर आलं आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादीवर विरोधी पक्षांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. या प्रश्नांना उत्तर देत प्रारुप मतदार यादीतील संभाव्य दुबार मतदारांची वार्डप्रमाणे आकडेवारी समोर आली असून 11 लाखांहून अधिक दुबार मतदार असल्याचे समोर आलं आहे. मुंबई महानगरपालिकेने प्रसारित केलेल्या यादीत 11,01,505 एवढी दुबार नावे आहेत. एस. वार्डमध्ये सर्वाधिक दुबार मतदार असून येथे 69500 दुबार मतदारांची संख्या नोंद झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. तर,बी वार्डमध्ये सर्वात कमी दुबार मतदारांची आकडेवारी असून बी वार्ड मध्ये 8,398 दुबार मतदार आहेत.

Related posts