महाराष्ट्र

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची हत्या?

इस्लामाबाद: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान २०२३ पासून रावळपिंडीतील अदियाला तुरुंगात आहेत. आता त्यांच्या हत्येची अफवा पसरली आहे. पाकिस्तानी सरकार आणि सैन्यानं त्यांचा छळ केल्याचे आरोप आहेत. इम्रान खान यांना भेटण्याची परवानगी कोणालाच दिली जात नसल्यानं त्यांच्या प्रकृतीबद्दल उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.
मंगळवारी रात्री (२५ नोव्हेंबर) इम्रान खान यांच्या बहिणी नोरीन खान, अलीमा खान आणि उजमा खान तुरुंगात त्यांना भेटायला गेल्या होत्या. पण त्यांना इम्रान खान यांना भेटू देण्यात आलं नाही. तिघींना तिथून पळवून लावण्यात आलं. त्यांना मारहाणदेखील करण्यात आली. कोणत्याही परिस्थितीत इम्रान खान यांना भेटण्याची मागणी पीटीआयच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. इम्रान खान यांच्या मृत्यूच्या बातम्या केवळ अफवा असल्याचं सरकारकडून सांगण्यात येत आहे.इम्रान खान यांच्या तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे हजारो कार्यकर्ते तुरुंगाबाहेर जमले आहेत. ते आपल्या नेत्याच्या आरोग्याबद्दल तुरुंग प्रशासनाकडे माहिती मागत आहेत. समर्थकांना नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून तुरुंगाबाहेर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शेकडोंच्या संख्येनं सुरक्षा रक्षक उपस्थित आहेत.

Related posts