परंडा

नळदुर्ग नगरीचे ग्रामदैवत श्री.खंडोबा देव यांचे आगमन..

दैनिक राजस्व
अविनाश नाईक/नळदुर्ग प्रतिनिधी

नळदुर्ग- येथील खंडोबा देवाच्या यात्रेला निमित्त दिनांक ५ डिसेंबर रात्री बारा वाजता नळदुर्ग येथील मानकरी खंडोबा ( देव) आणण्यासाठी अणदूर जातात. मानपानाच्या कार्यक्रमानंतर अणदूर व नळदुर्ग ( मेलारपुर ) येथील मानकरीमध्ये श्री खंडोबाचे मूळ मूर्ती नेणें व आणण्यासाठी लेखी करार होऊन ६ डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या अडीच वाजता पालखीचे मैलारपुरकडे प्रस्थान झाले.
पहाटे पाच वाजता मैलारपुर येथे श्री. खंडोबाचे आगमन झाले.त्या ठिकाणी श्री ची विधिवत प्रतिष्ठापना केली गेली…
येथील श्री खंडोबाचे मुख्य मूर्ती सव्वदहा महीने अणदुर येथे तर
पावणेदोन महीने नळदुर्ग . मैलारपूर येथे वास्तव्यास असते. महाराष्ट्र मधील हे एकमेव असे उदाहरण आहे जिथे खंडोबा मूर्ती (देव) एकच परंतू मंदिरे दोन नळदुर्ग व अणदुर हया दोन गावमध्ये आहेेत..हे दोन्ही मंदिरे पारंपारीक पद्धतचे दर्शन घडवतात आहेत…

Related posts