उस्मानाबाद 

धाराशिव (उस्मानाबाद) च्या नूतन शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले,
विभागीय संपादक-मराठवाडा.

धाराशिव (उस्मानाबाद) तालुक्यातील नूतन शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.

शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे साहेब, आदित्यजी ठाकरे साहेब, धाराशिव संपर्कप्रमुख आमदार तानाजीराव सावंत, मा. खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, धाराशिव जिल्हाप्रमुख आमदार कैलासदादा पाटील यांच्या आदेशाने तालुका प्रमुख सतीश कुमार सोमाणी यांनी धाराशिव तालुक्यातील नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या काल शिवसेना जिल्हा संपर्क कार्यालयात जाहीर केल्या.

या नियुक्त्या मध्ये केशेगाव विभागप्रमुख पदी मुकेश पाटील, सांजा गण प्रमुख पदी सचिन देशमुख, बेंबली विभागाचे रुईभर उप गण प्रमुख पदी प्रवीण पांथरे, केशेगाव विभागाचे करजखेडा गण प्रमुख पदी नेताजी गायकवाड, केशेगाव गण प्रमुख पदी महेश कारभारी, आंबेजवळगे गण प्रमुख पदी संदीप गोफणे , वडगाव गण प्रमुख पदी विजय कोळगे तर चिखली गण प्रमुख पदी समाधान जाधव यांची निवड करण्यात आली.

सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मा. सतिशकुमार सोमाणी यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी व शिवसेना पक्षवाढी साठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी अनेक शिवसैनिक बांधव उपस्थित होते.

Related posts