उस्मानाबाद 

धाराशिव (उस्मानाबाद) येथील अमित उंबरे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश.

खासदार, आमदार तसेच नगराध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत केला पक्षप्रवेश.

धाराशिव (उस्मानाबाद) – धाराशिव येथिल श्री. अमित विश्वनाथ उंबरे यांचा शिवसेना पक्षात लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ.कैलास घाडगे-पाटील, धाराशिव नगरपालिकेचे नगराध्यक्ष श्री नंदूभैया उर्फ मकरंद राजेनिंबाळकर यांच्या उपस्थितीत जाहीर पक्ष प्रवेश करण्यात आला.

हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत भगव्या विचारांना प्रेरित होऊन, शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री उद्धवजी ठाकरे व युवासेना प्रमुख तथा राजशिष्टाचार व पर्यावरण मंत्री मा.ना.श्री आदित्यजी ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना संपर्कप्रमुख प्रा.आ.श्री तानाजीराव सावंत, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री मा.ना.श्री शंकररावजी गडाख-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज श्री अमित उंबरे यांचा पक्षप्रवेश घेऊन पक्षात स्वागत करून पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पक्षाच्या वाटचालीस निश्चितच फायदेशीर राहील अशी आशा व्यक्त केली.

याप्रसंगी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ.कैलास पाटील, नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदुराजे निंबाळकर, जि.प.सदस्य उद्धव साळवी, गटनेते सोमनाथ अप्पा गुरव, दिपक जाधव, शहरप्रमुख संजय मुंडे, माजी शहरप्रमुख प्रविण कोकाटे, उप शहरप्रमुख तुषार निंबाळकर, अमर माळी, नेताजी राठोड यांच्यासह नागरिक पदाधिकारी उपस्थित होते.

Related posts