26.2 C
Solapur
September 21, 2023
उस्मानाबाद  तुळजापूर

धाराशिव (उस्मानाबाद) च्या शिवसेना अल्पसंख्याक सेनेच्या जिल्हाध्यक्ष पदी अमीर शेख यांची नियुक्ती.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले,
विभागीय संपादक-मराठवाडा.

धाराशिव (उस्मानाबाद) – धाराशिव (उस्मानाबाद) च्या शिवसेना अल्पसंख्याक सेनेच्या जिल्हाध्यक्ष पदी अपसिंगा ग्रामपंचायत सदस्य मा. अमीरभाई शेख यांची नियुक्ती करण्यात आली. शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळंब-धाराशिवचे विद्यमान आमदार मा. कैलासदादा पाटील यांनी अमीर शेख यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार केला.

तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा गावचे विद्यमान शिवसेना ग्रामपंचायत सदस्य मा. अमिरभाई शेख हे त्यांच्या कार्यशैली च्या माध्यमातून प्रसिद्ध आहेत. सर्व प्रकारच्या शासकीय कार्यालयांशी व प्रशासकीय अधिकाऱ्यांशी असलेले त्यांचे संबंध तसेच विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवणे, अडचणीत असलेल्या नागरिकांना सर्वोपरी मदत करण्यासाठी अमिरभाई परिचित आहेत. त्यांनी आजपर्यंत ग्रा. सदस्य, वनसंवर्धन समितीचे अध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्या अगदी योग्य रित्या पार पाडल्या आहेत. याचेच फलित म्हणून त्यांच्यावर आज शिवसेनेच्या “अल्पसंख्याक सेना जिल्हाध्यक्ष” पदाची धुरा सोपविली असल्याचे बोलले जात आहे.

नियुक्ती दरम्यान कळंब-धाराशिवचे विद्यमान आमदार मा. कैलासदादा पाटील, धाराशिवचे शिवसेना तालुकाप्रमुख मा. सतिशकुमार सोमाणी यांच्यासह अनेक शिवसैनिक बांधव उपस्थित होते.

Related posts