सौ. कल्पना मोरे-रोचकरी प्रतिनिधी/तुळजापूर
तुळजापूर -आम्ही हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक आहोत त्यामुळे आम्ही सध्याचे शिवसेनेचे पक्षप्रमुख आमचे काळीज उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या सोबत आहोत आणि भविष्यातही कायम राहणार.शिवसेना ही आम्हा सर्व शिवसैनिकांचे एक कुटुंब आहे.आणि आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब हे आमचे कुटुंबप्रमुख आहेत यात कसलीच शंका असणार नाही. शिवसेनेने आजवर कित्येक सामान्य सैनिकांना त्यांच्या पक्षातील कामाची पावती दिली आहे.छोटे मोठे व्यवसाय करून उदरनिर्वाह करणार्या शिवसैनिकांना शिवसेनेने नगरसेवक,आमदार, खासदार,राज्यमंत्री,कॅबिनेट मंत्री पद देऊन त्यांचा सन्मान करत उभ्या महाराष्ट्राला त्यांची ओळख करून दिलीय.
या चळवळीत शिवसेनेने चांगले कटु अनुभव ही तितकेच पेलले आहेत.मातोश्री हेच आपले श्रद्धास्थान असंख्य शिवसैनिक आपली नाळ शिवसेनेशी कायमची जोडुन काम करत आहेत..पण काही लोक शिवसेना सोडुन गेले पण शिवसेना डगमगली नाही ना किंचीत हललीसुद्धा नाही.शिवसेना हा वटवृक्ष आहे ज्याची मुळ प्रत्येक प्रामाणिक शिवसैनिकांच्या रूपात इतकी खोलवर गेली आहेत कि हा वटवृक्ष कायम उभा राहील अखंड.
शिवसेनेचे बोट धरून मोठं होऊन शिवसेनेसोबतच गद्यारी केलेल्या बांडगुळांचे अनुभवही आम्ही घेतलेत पण शिवसेनेचे नाव त्यांच्या समोरून निघाल्यावर आज त्यांचे अस्तित्व मातीमोल झालेले उभ्या महाराष्ट्रानी पाहीलय.शिवसेना ही वाघांची टोळी आहे अशा गद्यार कागदी वाघांच्या डरकाळ्या आमच्या समोर कधी टिकल्या नाहीत ना यापुढे टिकतील.
काल शिंदेगटानी काही बंडखोर आमदारांना सोबत घेऊन गुवाहाटीत पळ काढला आणि शिवसेना विरोधातच कट रचण्यास सुरूवात केली.या आमदारांना मला एक सांगायचे आहे कि,चार लोकं निघुन गेल्याने शिवसेनेला काही फरक पडणार नाही.शिवसेनेच्या नावाने मोठं झालात परत शिवसेनेत या मा.उद्धवजी ठाकरे साहेब तुम्हाला परत शिवसेनेत सामावुन घेतील पण शिवसेनेच्या नावाने बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या नावाने वेगळा असा नविन गट तयार करणार असाल तर याला आम्ही शिवसैनिक माफ करणार नाहीत.
आज महाराष्ट्रभर बंडखोर आमदारांनो तुमच्या विरोधात शिवसैनिकांचा आक्रोष तुम्ही पाहताय अजुनही वेळ गेला नाही परत या.तुम्ही शिवसैनिक आहात आणि शिवसेना हिच तुमची सगळ्यात मोठी ओळख आहे. शिवसैनिक हे नाव समोर काढुन यापुढे निवडुन येऊन दाखवा.तमाम शिवसैनिकांनी जिवाचे रान करून तुम्हाला तुमच्या मतदार संघातुन निवडुन दिलं आहे त्यांच्या मनांचा भावनांचा विचार न करता अमिषाला बळी पडुन पळुन गेलात हे कितपत योग्य आहे.शिवसैनिकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं,पक्षप्रमुखांनी तुमच्या खांद्यावर हात ठेवला म्हणुन तुम्ही आज मंत्री झालात हे सत्य विसरून चालणार नाही.
आम्ही तमाम शिवसैनिक उदारमतवादी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या सोबत आहोत आणि कायम रहाणार. शिवसेनेच्या विरोधात पाऊल उचलाल तर महाराष्ट्रात पाऊल टाकणे कठीण होईल.गुवाहाटीतील थंड वातावरण व विविध अमिषांची नशा याने तुमच्यातील शिवसैनिक तुम्ही विसरून गेला असाल पण महाराष्ट्रातील मातोश्री ते वाड्या वस्त्यापर्यंतचा शिवसैनिक धगधगती आग आहे जो शिवसेना विरोधातील भस्मासुराला जाळुन टाकण्यास कायम कटिबद्ध.
उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आजवर मुख्यमंत्री म्हणुन केलेल्या कामाबद्दल विशेष म्हणजे कोरोना काळातील केलेल्या कामाबद्दल तमाम शिवसैनिकांची छाती गर्वाने फुगेल असे अभिमानास्पद कार्य आहे त्यामुळे आमच्या प्रत्येक शिवसैनिकांचे मत आहे कि उद्धवजी ठाकरे साहेब हेच संपुर्ण कार्यकाल मुख्यमंत्री रहावेत.असा संयमी उदारमतवादी मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला हेच महाराष्ट्राचे भाग्य.
।। जय महाराष्ट्र ॥
– चेतन (भाऊ) बंडगर
शिवसेना सोशल मिडीया तालुकाप्रमुख तुळजापुर तालुका