सौ. कल्पना मोरे-रोचकरी तुळजापूर/प्रतिनिधी.
तुळजापूर – आम्ही उद्धव साहेबांसोबत मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्ही
आम्ही हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक आहोत त्यामुळे आम्ही सध्याच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख आमचे काळीज उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या सोबत आहोत आणि भविष्यातही कायम राहणार शिवसेनाही आम्हा सर्व शिवसैनिकांचे एक कुटुंब आहे आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब हे आमचे कुटुंब प्रमुख आहेत यात कसलीच शंका असणार नाही. शिवसेनेने आजवर कित्येक सामान्य शिवसैनिकांना त्यांच्या पक्षातील कामाची पावती दिली आहे छोटे व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या शिवसैनिकांना शिवसेनेने नगरसेवक ,आमदार, खासदार, राज्यमंत्री, कॅबिनेट, मंत्रिपद देऊन त्यांचा सन्मान केला, उभ्या महाराष्ट्राला त्यांची ओळख करून दिली या चळवळीत शिवसेनेने चांगले कटू अनुभवही तितकेच पेलले आहेत.
मातोश्री हेच आमचे श्रद्धा स्थान असंख्य शिवसैनिक आपली नाळ शिवसेनेची कायमची जोडून काम करत आहे. पण काही लोक शिवसेना सोडून गेले ,पण शिवसेना डगमगली नाही ना किंचित हल्ली सुद्धा नाही शिवसेना वटवृक्ष आहे ज्याची मूळ प्रत्येक प्रामाणिक शिवसैनिकाच्या रुपात इतकी खोलवर गेली आहेत की हा वटवृक्ष कायम उभा राहील अखंड शिवसेनेचे धोरण मोठ होऊन शिवसेने सोबतच गद्दारी केलेल्या भांडवलांचे अनुभव आम्ही घेतलेत ,पण शिवसेनेचे नाव त्यांच्या समोर निघाल्यावर आज त्यांच्या अस्तित्व मातीमुळे झालेले उभ्या महाराष्ट्राने पाहिलेत, शिवसेना ही वाघाची टोळी आहे ..अशा गद्दारा कागदी वाघाच्या डरकाळ्या आमच्या समोर कधीही टिकल्या नाहीत ना, यापुढे टिकतील
काल शिंदे गटनेता हे बंडखोर आमदार यांना सोबत घेऊन गोहाटी ला पळ काढला आणि शिवसेना विरोधात कट करण्याची सुरुवात केली या आमदाराला मला एक सांगायचे आहे की चार लोक निघून गेल्यावर आम्हला काही फरक पडणार नाही शिवसेनेच्या नावाने मोठे झालात परत शिवसेनेत या माननीय उद्धव साहेब तुम्हाला परत शिवसेनेत सामावून घेतील पण शिवसेनेच्या नावाने बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या नावाने वेगळा असा नवीन गट तयार करणार असाल तर त्याला आम्ही शिवसेना माफ करणार नाही
त्यामुळेच आज मी माझ्या वैद्यकीय मदत कक्ष तुळजापूर तालुका समन्वयक या पदाचा मी राजीनामा देत आहे व माझा राजीनामा स्वीकार करावा त्याच बरोबर शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष या माध्यमातून अनेक गोरगरिबांची कामे केली यापुढेही करणार पण महाराष्ट्रात घडलेल्या काही घडामोडी यावरून आम्ही शिवसैनिक सदैव उद्धव साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आमची निष्ठा सदैव मातोश्रीवर राहील असे महादेव पवार यांनी यावेळी सांगितले.