hacklink hack forum hacklink film izle hacklink chicken roadrocket playrocket playlunchtime resultsdeneme bonusujojobetjojobetbetciosuperbetinsuperbetin girişsuperbetinsuperbetin girişsuperbetinsuperbetin girişjojobetholiganbetjojobet
अक्कलकोट

अक्कलकोट भाजपचा विधानपरिषद निवडणुकीसाठी प्रचार मेळावा संपन्न

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) –
पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदार संघासाठी होत असलेल्या विधानपरिषद निवडणुकीच्या संदर्भात आज अक्कलकोट शहर व तालुका भाजपच्या वतीने प्रचार मेळावा संपन्न झाला.शिक्षक उमेदवार जितेंद्र पवार व पदवीधर उमेदवार संग्राम देशमुख या दोघांच्या प्रचार नियोजनार्थ हा मेळावा घेण्यात आला.सर्जेराव जाधव सभागृहात आयोजित मेळावाप्रसंगी दोन्ही उमेदवारांसह खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी, माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख, भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख,माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे,आमदार सचिन कल्याणशेट्टी,यशवंत धोंगडे,महेश हिंडोळे मोतीराम राठोड,मिलन कल्याणशेट्टी, सुरेखा होळीकट्टी,किरण केसुर,भीमाशंकर इंगळे,दयानंद उंबरजे,दयानंद बिडवे,प्रदीप पाटील,मलकप्पा भरमशेट्टी,शशिकांत चव्हाण आदींची उपस्थिती होती.

यावेळी खासदार डॉ. जयसिद्धेशवर शिवाचार्य महास्वामी म्हणाले की भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा स्वामी समर्थांचा तर भिऊ नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत हा पदवीधरांचा व शिक्षकांचा आशिर्वाद पुणे पदवीधर मतदार संघाचे उमेदवार संग्राम संपतराव देशमुख व जितेंद्र पवार यांना असल्याचे प्रतिपादन केले. माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख म्हणाले की प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपणच उमेदवार असल्याचे समजून कामाला लागावे,पक्षाने चारित्र्य संपन्न आणि तरुणांसाठी युवा उमेदवार दिला आहे. त्यामुळे आपलं काम अधिक सोपं झालं आहे.माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे म्हणाले, विधान भवनाच्या पायऱ्या झप झप चढून जाणारा, आपल्या प्रत्येक प्रश्नांवर दिल्लीत धडक मारू शकणारा, तरुण तडफदार उमेदवार पदवीधरांना निवडून द्यायला हवा. समर्थांच्या पायाचा स्पर्श झाला की तो व्यक्ती मंत्री होतो. यापूर्वी प्रकाश जावडेकर, चंद्रकांतदादा पाटील यांनी अनुभव घेतला आहे. तसेच
आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले, संग्राम संपतराव देशमुख यांच्या सारखा युवा नेते व जितेंद्र पवार हे नक्कीच आमदार होतील. भिऊ नकोस तुझ्या पाठीशी आहे,असं सांगणाऱ्या स्वामी समर्थ यांचा आशीर्वाद नक्कीच त्यांच्या पाठीशी राहील. या विभागातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघावर भाजपचाच झेंडा फडकेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.यावेळी सुत्रसंचालन शिवशरण जोजन यांनी केले तर आभार जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रदीप पाटील यांनी मानले

Related posts