26.3 C
Solapur
September 29, 2023
अक्कलकोट

हिरकणी महिला बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने जिजाऊ मॉ साहेंबाची जयंती उत्साहात साजरी.

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) –
येथील सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, महिला सबलीकरणच्या कार्यात अग्रेसर असलेल्या हिकरणी महिला बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ मॉ साहेंबाची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

हिकरणी महिला बहुउद्देशिय संस्थेकडून विविध उपक्रम राबविले जात असतात. महिला चळवळीचे व्यासपिठ असून संस्थेकडून सुरू असलेल्या कार्यामुळे संस्थेचे नाव आता तालुका, जिल्ह्या पुरते राहिलेले नाही तर राज्यात झालेले आहे. सदर संस्थेला श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले व आधार स्तंभ अमोलराजे भोसले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. दरम्यान संस्थेच्या कार्यात राष्ट्रामाता जिजाऊं मॉ साहेंबाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

संस्थेच्या अध्यक्षा अलकाताई जन्मेजयराजे भोसले, उपाध्यक्ष रत्नमाला मचाले, सचिवा अर्पितराजे भोसले, संस्थेच्या क्रांती वाकडे, भाग्यश्री वाकडे, राणी वाकडे, छाया पवार, स्वप्ना माने, मथुराबाई पाटील, स्वामी निकम, पल्लवी कदम, रुपाली पवार, ज्योती सलबत्ते, सुवर्णा घाडगे, वैशाली यादव, स्मिता कदम, साक्षी पवार, प्रतिभा पवार आदीजण महिला बहुसंख्येने उपस्थित होते.

Related posts