पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, 304 मधील गुन्ह्यात आता 120 ब अंतर्गत, 460, 213, 214 हे कलम लावण्यात आले आहेत. 19 तारखेला जे अल्पवयीन तरुणाचे ब्लड सँपल आले ते दुसऱ्याचे बल्ड सँपल असल्याचे निष्पन्न झाले आहे. गाडी चालवत असलेल्या तरुणाचे ब्लड सँपल घेतले ते फेकून दिले. दुसऱ्याचे ब्लड सँपल घेतले आणि त्या अल्पवयीन तरुणाचे नाव वापरले.
ससूनच्या डॉक्टरांचा पर्दाफाश
डॉ श्रीहरी यांनी हे ब्लड रिपोर्ट बदलले. अजय तावरे यांच्या सांगण्यावरून डॉ. श्रीहरी यांनी हे ब्लड रिपोर्ट बदलले. ससून रुग्णालयात दुसऱ्या कुठल्या व्यक्तीचे सँपल घेतले आहेत याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. ससून हॉस्पिटलचे सगळे सीसीटिव्ही आम्ही तपासणार आहेत .
रक्ताचे नमुने बदलले
रक्ताचे नमुने बदल्यामुळे पहिल्या रिपोर्टमध्ये अल्पवयीन मुलगा दारू प्यायला होता हे निष्पन्न झालेच नाही. विशाल अग्रवाल आणि तावरे याचे संपर्क झाल्याचे समोर आले आहे. दुसऱ्या हॉस्पिटलमधून आलेल्या रिपोर्टमध्ये सुद्धा अल्पवयीन तरुण दारू प्यायला नव्हता हे निष्पन्न झाले आहे कारण रक्ताचे नमुने उशिरा गेले.