धारावी ही केवळ झोपडपट्टी नाही. तिथल्या प्रत्येक घरात कुटीरद्योग चालतो. अनेक छोटे छोटे उद्योग याठिकाणी चालतात. त्या उद्योगांचे काय होणार? हा प्रश्न आहे. सरकारने याठिकाणी बेसुमार टीडीआर काढून अदाणीला देण्याचा त्यांचा डाव आहे, तो कधीही यशस्वी होऊ देणार नाही. मुंबईभर अदाणींकडून टीडीआर विकत घेतला पाहीजे, ही अट आता राज्य सरकारने टाकली आहे. त्याविरोधात आम्ही दंड थोपटले आहेत. मागच्या आठवड्यात काही बातम्या आल्या आहेत. मोदी आणि शाह यांनी मुंबईची गिफ्ट सिटी गुजरातला पळून नेलेली आहे आणि मुंबईला अदाणी सिटी करण्याचा त्यांचा डाव आहे. उद्या कदाचित हे मुंबईचे नाव बदलून अदाणी सिटी करतील, पण आम्ही ते कदापी होऊ देणार नाही, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.संयुक्त हाराष्ट्राच्या चळवळीचे उदाहरण आपल्यासमोर आहे. मराठी माणूस पेटला तर अनेकांच्या डोक्यातील हवा बाहेर काढतो आणि मुंबई वाचवतो, हा इतिहास आहे. मुंबईला लुटण्याचे आणि मुंबईची तिजोरी रिकामी करण्याच जे चाळे सुरू आहेत, ते आम्ही होऊ देणार नाही. राज्य सरकारने अदाणींना जेव्हा टेंडर दिले, तेव्हा त्यात नसलेल्या गोष्टी ते आता अदाणीला देऊ करत आहेत. वारेमाप एसएफआय अदाणींना देण्याचे कारस्थान रचले जात असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली.