महाराष्ट्र

सोलापूर मधील 6२ मुली बेपत्ता आहे -शरद पवार

मुंबई: राज्यातील महिला आणि मुलींवरील वाढत्या हल्ल्यावरुन आणि त्यांच्या सुरक्षेच्या प्रश्नावरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारवर टीका केलीय. राज्यात गेल्या सहा महिन्यात 2458 मुली बेपत्ता आहेत आणि ही चिंतेची बाब असल्याचं शरद पवार म्हणाले. 14 जिल्ह्यातून एकून 4434 मुली बेपत्ता असल्याची माहितीही पवारांनी दिली.

शरद पवार म्हणाले की, राज्य सरकारला एक वर्ष झाले, अनेक प्रश्न समोर आहेत. त्यापैकी सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा कायदा आणि सुव्यवस्थेचा आहे. महिला आणि मुली यांच्यावर हल्ले होतायंत आणि दिवसेंदिवस त्यामध्ये वाढ होतेय ही चिंतेची बाब आहे.
पुणे, ठाणे, सोलापूर आणि मुंबई मधील महापालिकेच्या क्षेत्रातली माहिती माझ्याकडे आहे. जानेवारी 2023 पासून मुंबईतून ठाण्यातून 723 मुली, मुंबई 723 आणि सोलापूर 62 हा असा एकूण जवळपास 2458 मुली बेपत्ता आहेत.
समान नागरी कायद्यावर शिख, जैन आणि पारशी समाजाचं मत विचारात घ्यावं
शरद पवार यांनी समान नागरी कायद्याच्या प्रश्नावरुनही केंद्र सरकारला काही प्रश्न (Sharad Pawar On Uniform Civil Code UCC) विचारले आहेत. एकाच देशात दोन कायदे नको असं पंतप्रधानांनी म्हटल्याची माहिती आहे. त्यावर समान नागरी कायदा लागू करण्याचा विचार सुरू आहे. शिख समाज, जैन आणि इतर समाजांची भूमिका काय आहे हे स्पष्ट व्हाव. शिख समाजाचं वेगळं मत असल्याचं माझ्या कानावर आलं आहे. समान नागरी कायद्याला विरोध करण्याची भूमिका त्यांनी घेतल्याची माहिती आहे. कायदा आयोगाने सांगितल्याप्रमाणे सर्वांचं मत लक्षात घेऊन यावर निर्णय घ्यावं.

शरद पवार पुढे म्हणाले की, समान नागरी कायदा लागू करण्याची बातमी सगळीकडे पसरवली जातेय, हे कुठल्यातरी महत्त्वाच्या प्रश्नावरुन लक्ष विचलित करण्यासाठी केलं जातंय का हे पाहावं लागेल.

Sharad Pawar On Narendra Modi : पंतप्रधानांना उत्तर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्याला आज शरद पवारांनी उत्तर दिलं. ते म्हणाले की, भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. मी कोणत्याही बँकेचा सभासद नसतानाही माझ्यावर आरोप करण्यात आले. ज्यांच्यावर आरोप करण्यात आले त्यामध्ये भाजपचेही काही नेते होते.

राज्यातील दंगलीवरुन भाजपवर टीका
राज्यात गेल्या काही महिन्यांपासून दंगली घडवल्या जात असल्याचं शरद पवार म्हणाले. ते म्हणाले की, कोल्हापूर, संगमनेर आणि इतर ठिकाणी दंगली घडवण्यात आल्या. या दंगली ठरवून घडवल्या जात आहेत. निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन या गोष्टी केल्या जात आहेत का हे तपासलं पाहिजे.

Related posts