साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले,
विभागीय संपादक-मराठवाडा.
धाराशिव (उस्मानाबाद) – रेमडेसीवीर इंजेक्शनच्या १०००० व्हाईल उस्मानाबाद(धाराशिव) जिल्ह्यासाठी लवकरच उपलब्ध होणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळंब-धाराशिव चे आमदार, आ. कैलास पाटील यांनी दिली.
जिल्हात कोरोनाचा दिवसेंदिवस वाढता प्रभाव व कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचार करताना आवश्यक असलेल्या रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा कमी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे, आरोग्यमंत्री ना. राजेशजी टोपे, अन्न व औषध प्रशासन मंत्री ना.राजेन्द्रजी शिंगणे, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री ना. शंकरराव गडाख-पाटील यांच्याकडे मा.मंत्री प्रा.डॉ.आ. तानाजीराव सावंत, खासदार श्री.ओमप्रकाश राजेनिंबाळकर तसेच आ. ज्ञानराज चौगुले तसेच आ. कैलास पाटील या शिवसेना लोकप्रतिनिधींनी इंजेक्शन्सच्या मुबलक उपलब्धतेसाठी मागणी केली होती. त्याअनुषंगाने उस्मानाबाद जिल्ह्यासाठी १०००० व्हाईल्स येणाऱ्या दोन-तीन दिवसांत उपलब्ध होतील. उपलब्ध होणाऱ्या व्हाईल्स या शासकीय तसेच खाजगी कोविड रुग्णालयांना पुरवठा करण्यात येणार आहेत. यामुळे जिल्ह्यातील गरजु रुग्णांना त्याचा मोठा फायदा होणार आहे, शिवाय नातेवाईकांची होणारी फरपट देखील थांबण्यास मदत होईल अशी मागणी आ. कैलासदादा पाटील यांनी दिली.
जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसापासुन रेमडेसीवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा भासत आहे. त्यातही खाजगी दवाखान्यामध्ये तर ते मिळतच नसल्याचे दिसुन आले होते. आतापर्यंत गरजेनुसार तिथे इंजेक्शन उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केलेच होते. पण तात्पुरत्या स्वरुपात इंजेक्शन देऊन प्रश्न मिटणार नाही त्यासाठी साठा मागवुन घेणे अधिक गरजेचे असल्याचे लक्षात आले. त्यामुळे गेल्या काही दिवासापासुन त्या संदर्भात सबंधित खात्याच्या मंत्र्यासमवेत चर्चा करुन हा प्रश्न सुटण्यासाठी शिवसेना लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केला होता. यासंदर्भात मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्यासह आरोग्यमंत्री राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे यांच्याशी चर्चा केली. त्यांच्याकडुनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला, जिल्ह्यासाठी दहा हजार वायल्स उपलब्ध करुन देण्याचा शब्द राज्य शासनाच्यावतीने मंत्री महोदयानी दिला आहे. सध्या राज्यामध्येच मोठ्या प्रमाणात रेमडेसीवीर तुटवडा जाणवत असल्याने त्याच प्रमाणे जिल्ह्यात देखील तशीच स्थिती आहे. पण राज्यसरकारकडे केलेल्या पाठपुराव्याला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाल्याने आता रुग्णांना रेमडेसीवीरसाठी फिरण्याची वेळ येणार नाही असा विश्वास वाटतो असल्याचे आ. कैलासदादा पाटील यांनी यावेळी सांगितले.
ब्रेक द चेन अंतर्गत 1 मे पर्यंत राज्य शासनाने निर्बंध लावले आहेत. या काळात कुठल्याही नागरिकांनी विनाकारण घराबाहेर न जाता घरातच राहून कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी सहकार्य करावे. ही विनंती व आवाहन आ. कैलासदादा पाटील यांनी यावेळी जनतेला केले.