तुळजापूर

उस्मानाबादचे नामांतर धाराशिव करण्यासाठी युवा सेनेचे मुख्यमंत्र्याना निवेदन

साईनाथ जगन्नाथ गवळी
विभागीय संपादक – मराठवाडा विभाग

तुळजापूर,
उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव करण्यासाठी तुळजापूर तालुका युवा सेनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले.

तुळजापूर तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनामध्ये तुळजापूर तालुका युवा सेनेचे तालुकाप्रमुख प्रतिक रोचकरी शहरप्रमुख सागर इंगळे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, धाराशिव नाव जे अतिप्राचीन असून ते जिल्ह्यातील सर्व नागरिक आपल्या बोलीभाषेमध्ये उपयोगात आणतात हेच नाव जिल्ह्याचे वैभव आहे त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव करून शिवसैनिकांची मागणी पूर्ण करावी, असे निवेदनात म्हटले आहे.

निवेदनावर युवासेनेचे तालुकाप्रमुख प्रतीक रोचकरी, शहर प्रमुख सागर इंगळे, विद्यार्थी शहर प्रमुख ऋषिकेश इंगळे, कार्याध्यक्ष प्रदीप इंगळे, उपजिल्हाप्रमुख विकास भोसले, कृष्णा चव्हाण यांच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

Related posts