साईनाथ गवळी
तुळजापूर/उस्मानाबाद प्रतिनिधी.
शहरा मध्ये वीजटंचाई भासू नये यासाठी शासकीय विश्रामगृह, (शिंगोली) उस्मानाबाद येथे उस्मानाबाद शहरातील व ग्रामीण भागातील महावितरणच्या अधिकाऱ्यांचा समवेत शिवसेना लोकप्रतिनिधींची आढावा बैठक घेतली. शहरा मध्ये वीजटंचाई भासू नये यासाठी वीजपुरवठा करणाऱ्या सबस्टेशनच्या दुरुस्त्या करण्यात याव्यात. शासकीय रुग्णालयात वीज पुरवठा कायम चालू राहावा यासाठी उपाय योजना करावी, कचरा डेपो येथे 100 kva चा ट्रान्सफॉर्मर देण्यात यावा. तसेच ग्रामीण भागात नविन कृषी पंपाची डिमांड भरून घेऊन अडिशनल ट्रान्सफॉर्मर टाकावेत. ढोकी ते पळसप मध्ये कार्यरत असलेल्या सबस्टेशन वरिल अतिरिक्त लोड कमी करण्यासाठी नविन सबस्टेशन प्रस्ताव तयार करावा. यामुळे ट्रान्सफॉर्मर वरिल लोड कमी होईल. ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती कामे पूर्ण करून घेऊन ट्रान्सफॉर्मर फेल झाल्यावर 48 तासाच्या आत बदलून देण्यात यावेत. नवीन sub station चे प्रस्ताव तयार करावेत व कार्यरत sub station वर अतिरिक्त डीपी ची आवश्यकता असेल तर तो मंजूर करावा व बसवण्यात यावा अशा प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या.
यावेळी धाराशिव चे खा. ओमराजे निंबाळकर, आ.कैलास घाडगे-पाटील, नगराध्यक्ष नंदूभैय्या राजेनिंबाळकर, महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री.श्रीकांत पाटील, कार्यकारी अभियंता कुलकर्णी मॅडम, कंत्राटदार खराबे आदी संबंधित उपस्थित होते.