पंढरपूर

बहुजन रयत परिषद व एन.वाय ग्रुपच्या वतीने कोमलताई साळुंके-ढोबळे यांचा नागरी सत्कार.

सचिन झाडे
पंढरपूर / प्रतिनिधी

बहुजन रयत परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षपदी कोमलताई साळुंखे- ढोबळे यांची निवड झाल्याने पंढरपूर येथे बहुजन रयत परिषद व एन.वाय ग्रुपच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन नागेश यादव यांच्यावतीने करण्यात आले होते.

यावेळी उपस्थित महिलांना नूतन महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा कोमलताई यांनी मार्गदर्शन केले तसेच समाजातील युवकांनी पदवीधर शिक्षण घेऊन पुढे यावे असे आवाहन करुन समाजातील अडीअडचणी सोडवण्यासाठी कायमच कटिबद्ध असल्याची ग्वाही उपस्थित नागरिकांना दिली.

यावेळी गोपाळपूर ग्रामपंचायतीचे बिनविरोध सदस्य विक्रम आसबे यांचा सत्कार करण्यात आला तसेच उपस्थित लाभार्थी महिलांना जन आरोग्य कार्डचे वाटप करण्यात आले.

यावेळी बहुजन रयत परिषदेचे जिल्हाध्यक्ष नागेश यादव, अण्णाभाऊ साठे युवक संघटनेचे मार्गदर्शक नानासाहेब वाघमारे, प्रकाश खंदारे, ॲड. किशोर खिलारे, ॲड. बादल यादव,भोला साठे, दुर्योधन यादव ,दशरथ यादव, नाथा यादव, भाऊसाहेब कांबळे आदींसह बहुजन रयत परिषदेचे कार्यकर्ते व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Related posts