वैराग दि ( किरण आवारे )
: बुधवारी झालेल्या जोरदार पावसाने बार्शी तालुक्यात नागझरी नदीला आलेल्या पुरामध्ये एक जण वाहून गेला तर अकरा जणांना वाचवण्यात प्रशासनाला यश आले आहे. पुराचे पाणी जसे ओसरेल तसे झालेले नुकसान पाहून बळीराजा धास्तावून गेला आहे….निवृत्ती रंगनाथ ताटे (वय ६५)(मूळ गाव – मानेगाव (धा) सध्या रा. मुंगशी (वा)) हे नागझरी नदीमधून गावाकडे परतत असताना अचानक नदीचा प्रवाह वाढल्याने नदीतच अडकले. दुपारी एकच्या सुमारास एका पत्र्याच्या शेडचा आधार घेऊन ते थांबले.पण पाणी वाढतच राहीले. त्यानंतर शेडच पाण्याखाली गेले. त्यानंतर शेजारील झाडाचा आधार घेतला,पण तीही फांदी तुटली.थोडा वेळ पोहले पण पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने ते वाहून गेले. गावकऱ्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला पण ते सापडले नाहीत.
दुपारी एक वाजल्या पासून चार वाजे पर्यंत हे थरारनाट्य गावकरी अनुभवत होते. मात्र मदतीला कोणेतेच प्रशासन पोहचले नाही. असे त्यांचे जावई पद्माकर क्षीरसागर यांनी सांगितले. तर दुसरीकडे याच गावातील नदीच्या पाण्यात अडकून झाडावर तब्बल १० तास आश्रय घेतलेल्या
भरत संदीपान क्षीरसागर यांना
बोटीच्या साहाय्याने मध्यरात्री २:३० वाजता महसूल कर्मचारी, पोलीस कर्मचारी व ग्रामस्थ यांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले.सासुरे गावातील राहुल कारंडे या शेतकऱ्यासह आणखी नऊ जणांचे नागझरी नदीला आलेल्या पुरातून प्रशासनाच्या मदतीने सहीसलामत बाहेर काढून प्राण वाचविले.यासाठी आमदार राजेंद्र राऊत हे मध्य रात्री 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी , प्रांताधिकारी,तहसीलदार यांच्या सतत संपर्कात होते. रेस्क्यू टीमच्या मदतीने ज्या शेतकरी बांधवांचे प्राण वाचविण्यात यश आले. त्या शेतकऱ्यांची भेट आमदार राजेंद्र राऊत यांनी घेऊन विचारपूस केली. या सह त्यांनी
वैराग भागातील सासुरे, मुंगशी (वा),राळेरास, शेळगाव (आर), पानगाव, मानेगाव आदी गावांना भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी झालेल्या नुकसानीची भरपाईची मागणी शासन दरबारी करून ती मिळवून देण्याचे वचन दिले.या वेळी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना त्यांच्यासोबत संतोष दादा निंबाळकर, वासुदेव बापू गायकवाड, आप्पासाहेब शिरसागर, शिवाजी सुळे, बाबा गायकवाड, नाना धायगुडे, तात्यासाहेब कारंडे, बालाजी आवारे, शरद गायकवाड व शेतकरी बांधव उपस्थित होते.
टिप : सोबत फोटो पाठवला आहे…..