कविता 

सर मी विद्यार्थी बोलतोय – – – –

कवि:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव
सहशिक्षक श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद।

———————————–

सर, मी आपला लाडका
विद्यार्थी बोलतोय- –

सर सांगा ना मला
आपली शाळा सुरू होतेय कधी? कोरोणा ने घोळ केला आमचा एक वर्ष वाया गेला!
बिना संस्कार, ना शिस्त ,ना संयम, ना प्रार्थना, ना राष्ट्रगीत, आमच्या हातात फक्त आणि फक्त मोबाईल होता !
म्हणे ऑनलाईन रहा
सतत नेट वापरा चेक
करत रहा, सर ना पुस्तक ना वही ना लेखन काम
फक्त व्हिडिओ बघण्याचे
सध्या एकच काम, सर तुम्ही मोबाईलवर दिसत नाही
ते दुःख वेगळे, इथं बस,
तिथं बस, रांगेत जा,
रांगेत ये,कविता म्हण,
चालीवर गा, उदाहरणे सोडव, प्रॅक्टिकल कर, असं म्हणत आम्हाला कोणी रागावतही नाही सर मला आठवण येते, आपल्या शाळेची,तुमच्या प्रेमळ स्वभावाची, मायेची, सर सांगा ना मला, आपली शाळा सुरू होतेय कधी? सर मी आता खोड्या करणार नाही, तुम्हाला खोटे बोलणार नाही, क्लास तुमचा कधीही बुडवणार नाही,
माफ करा मला सर, शाळा आणि तुमच्या विना मी खरा विद्यार्थी नाही!
सर सांगा ना मला, आपली शाळा सुरू होतेय कधी?

आपली शाळा सुरु होतेय कधी?

Related posts