दक्षिण सोलापूर

लसीकरणात सहभागी व्हा,देशाला कोरोनामुक्त कराः आ. सुभाष देशमुख

दक्षिणमधील आरोग्य केंद्रांना भेटीदरम्यान केले आवाहन

अशोक सोनकंटले
विशेष प्रतिनिधी दक्षिण सोलापूर

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार देशभरात ११ एप्रिल ते १४ एप्रिल लसीकरण उत्सव साजरा करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने मंगळवारी दक्षिण तालुक्यातील सर्व आरोग्य केंद्रावर लसीकरणास नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. आ. सुभाष देशमुख यांनी सर्व आरोग्य केंद्रांना भेटी देत सर्वांनी न घाबरता लस घेत कोरोना मुक्त भारत करून पंतप्रधान नरेंद्र मोदींना साथ द्यावी, असे आवाहन केले.

 दक्षिण तालुक्यातील  सोरेगाव, कंदलगाव, मंद्रूप, माळकवठे, सोरेगाव येथील आरोग्य केंद्राला आ. देशमुख यांनी भेट देत आजवर तालुक्यात लसीकरणाला मिळालेला प्रतिसाद, एकूण आकडेवारी, कोणत्या गावात काय परिस्थिति आहे, याची संपूर्ण माहिती घेतले. यावेळी आ. देशमुख म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी जगातील सर्वांना लस मिळावी या दृष्टीने नियोजन केले आहे. त्यामुळेच लसोत्सव साजारा होत आहे. आपण स्वतः लस घेतली आहे. लस घेतल्यानंतर कोणताही त्रास होत नाही. त्यामुळे भीती न बाळगता सर्वांनी लस घ्यावी, दुसर्‍यांनाही लस घेण्यास सांगावे.  कोरोना महामारीने सर्वांचेच नुकसान केले आहे. त्यामुळे लस घेऊन देशाला कोरानामुक्त करावे.

यावेळी  आ. देशमुख यांनी अधिकारी वर्गांना आणखीन गतीने करण्यासाठी लसीकरण वाढवण्याबाबत सूचना केल्या.  यावेळी हणमंत कुलकर्णी, नगरसेविका अश्विनी चव्हाण, नगरसेविका संगीता जाधव, प्रशांत कडते, इरप्पा बिराजदार, विश्वनाथ हिरेमठ, मळसिद्ध मुगळे, दक्षिणचे तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, काशिनाथ कदम, महेश देवकर, भीमराव कुंभार,श्रीनिवास करली, आप्पासाहेब पाटील, यतिन शहा, महादेव कमळे, आण्णराव बाराचारी,  शशी थोरात, सुनिल गुंड, आनंद बिराजदार, श्रीमंत बंडगर,  श्रीनिवास पुरूड़, श्रीकांत ताकमोगे, अतुल गायकवाड, भारत जाधव, अमोल गायकवाड, प्रथमेश कोरे, अक्षय अंजीखाने आदी उपस्थित होते.

Related posts