तुळजापूर

पार्थने पटकावले आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड परीक्षेमध्ये सुवर्णपदक.

किलज
तुळजापूर तालुक्यातील किलज येथील पार्थ उमेश भोईटे या मुलाने या वर्षी झालेल्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड परीक्षेत सुवर्णपदक मिळवून गावाचे नाव रोशन केले आहे. सोलापूर जिल्ह्यातील डोड्डी येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत असलेले उमेश भोईटे यांचा हा मुलगा असून पद्मश्री सुमतीबाई इंग्लिश मिडीयम स्कूल सोलापूर येथे त्याचे शिक्षण सुरू आहे. पार्थ हा २ री चा विद्यार्थी असून मुर्ती लहान पण कीर्ती महान या आदर्शाची ज्योत लावल्याने आई – वडिलांबरोबरच गावची मान सुद्धा उंचावली आहे. पार्थच्या यशाचे गावपातळीवर असणारे सर्व व्हॉट्सऍप ग्रुप, शिक्षक, वरिष्ठ अधिकारी, ग्रामस्थ तसेच मान्यवर मंडळी यांच्या कडून भरभरून कौतुकांचा वर्षाव होत आहे.

आपला पाल्य फक्त पदवी मिळविण्यासाठी शिकवायचा नाही, तर जीवनातील व्यवहारांचे चढ-उतार, संघर्षाला सामोरे जाण्यासाठी घडवायचा आहे याची जाणीव होणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्याला जेव्हा याची जाणीव होईल तेव्हा तो नुसता परीक्षार्थी न राहता ज्ञानार्थी होईल यात शंका नाही.

Related posts