तुळजापूर

सलगरा (दि.) येथील ग्रा.पं. कार्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साधेपणाने साजरी.

सलगरा दि / प्रतिनिधी
प्रतिक शेषेराव भोसले

१४ एप्रिल रोजी भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सलगरा (दि.) येथील ग्रामपंचायत कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा मूलमंत्र देऊन आपणा सर्वांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे सरपंच विष्णू अर्जुन वाघमारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या वेळी उपसरपंच प्रशांत उत्तमराव लोमटे, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत प्रभाकर मुळे, जिवन कमलाकर लोमटे, शशिकांत अनिल लोमटे यांच्या सह अन्य ग्रामस्थ व ग्रा.पं. कर्मचारी उपस्थित होते.

Related posts