अक्कलकोट (प्रतिनिधी) –
पुणे पदवीधर मतदारसंघात व शिक्षक मतदारसंघ महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड,जयंत आसगावकार निवडून आल्याबद्दल अक्कलकोट मध्ये विजय जल्लोष मोठ्या उत्साहात पार पडला त्यावेळी माजी गृहराज्यमंत्री सिद्धारामजी म्हेत्रे याच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला.
महाविकास आघाडीचा सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी तळागाळात जाऊन मतदारांशी गाठीभेटी घेऊन विजय हा खेचून आणण्याचा प्रयत्न केला. असे प्रतिपादन सिद्धाराम म्हेत्रे यांनी केले.महाविकास आघाडीचा वर्षपूर्ती होऊन त्यात झालेला विकासाचा पोच पावती लक्षात घेऊन आणि दहा वर्षे पदवीधर व शिक्षक मतदारसंघात प्रश्न सुटत नसल्यानेच हा विजय झाला आहे .
याप्रसंगी दुधनी विविध विकास सोसायटीचे चेअरमन प्रथमेश म्हेत्रे,जिल्हाउपाध्यक्ष अरुण जाधव,माजी सभापती विलास गव्हाणे , महिला तालुकाध्यक्षा मंगला पाटील, शहराध्यक्ष भीमा कापसे,तालुका युवकाध्यक्ष बाबासाहेब पाटील ,मुबारक कोरबू,श्रीशैल अल्लोली,रामचंद्र समाणे ,माणिक बिराजदार,शिवराज स्वामी,वकील बागवान ,सातलिंग गुंडर्गी,धर्मराज गुंजले ,सरफराज शेख,महादेव चुंगी,अलिबशा अत्तार ,विश्वनाथ हडलगीनितीन कटारे ,राजू पाठोळे, शिवशरण इचंगे,जब्बर बागवान राहुल भाकरे,प्रवीण हताळे,सतीश चिंचोळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.