प्राध्यापक नवनाथ गोसावी
भारत हा कृषिप्रधान देश आहे व त्याचबरोबर भारतात रोजगार निर्मितीसाठी बरीच मोठी संधी आहे परंतु 2019- 20 या वर्षाचा जर विचार केला तर व त्याच बरोबर 2020 -याही वर्षांचा विचार केला तर आपल्या असे लक्षात येते की एकट्या भारतातील 90 टक्के कामगारांचा रोजगार गेला आहे त्यातील बरेच कामगार असंघटित क्षेत्रात काम करतात जर आपण माणूस म्हणून त्या गोष्टीचा विचार केला तर रोजंदारीवर काम करणारे मजूर ज्यांना की आपण नाका कामगार किरकोळ व्यवसाय करणारे यांचा या दोन वर्षांमध्ये काय हालत झाली असेल याची कल्पनाही करवत नाही पाठीमागील काळात आपण विविध क्षेत्रातील न्यूज वाल्यांनी दाखवले की हेच मजूर हजारो किलोमीटरचा प्रवास करून आपले घर गाठण्याचा प्रयत्न केला कारण त्याच्यावरती जी उपासमारीचे संकट समोर दिसत होते कुठल्याही प्रकारचा रोजगार त्यांना उपलब्ध नव्हता ना राहिला घर होते ना हाताला काम अशी अवस्था त्यांची झाली होती याही गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे असंघटित क्षेत्रात काम करणारे नोकरदार वर्ग आहे त्यांच्याही बाबतीत तेच संकट उभे आहे जी नोकरी आहे ती राहते की नाही किती पण जाते अशी दुहेरी संकट त्यांच्यावर ती होते जर आपण याचा विचार केला तर आपल्या असे लक्षात येते की याचा मागील दोन वर्षांमध्ये भारतीय अर्थकारणावर ती बराच मोठा परिणाम झाला होता जर आपण भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार केला व त्याच्या वाटचालीवर ती बारकाईने लक्ष ठेवले तर आपल्या असे लक्षात येते की जवळ जवळ तब्बल पंचवीस टक्क्यांनी भारतीय अर्थव्यवस्था खाली आलेली आहे त्याचबरोबर एकट्या कृषी क्षेत्राचा वाटा सोडला तर बाकी सर्व क्षेत्रातील गुंतवणूक रोजगार हे सर्व कमी झालेले दिसते जर आपण पाहिले तर भारतात तीन प्रकारची बेरोजगारी वाढली आहे एक म्हणजे कामाचे तास कमी करण्यात आलेले आहेत दुसरे म्हणजे रोजंदारीवर असलेले रोजगार गेला आहे व तिसरे म्हणजे सोय रोजगार नष्ट झाले आहेत त्याचबरोबर आपण विचार केला तर आपल्या असे लक्षात येते की शिक्षण प्रशिक्षणात ही अडथळे आहेत जे शिक्षण भेटायला पाहिजे याचा उपयोग भविष्यात रोजगारनिर्मितीसाठी होईल असे प्रशिक्षणही उच्च व तरुण वर्गांना मिळत नाहीये प्रशिक्षण नसल्यामुळे शिक्षित तरुण असूनही पाहिजे ते ज्ञान त्यांच्याकडे नसल्यामुळे त्यांना त्या रोजगारापासून वंचित राहावे लागत आहे आपण याचा विचार केला तर आपल्या लक्षात येते की बेरोजगार बरोबरच आपले केंद्र सरकार राज्य सरकार यांना मिळणाऱ्या महसुलातून विविध कर व महसुलातून कर पोटी मिळणारी हजारो कोटीचे उत्पन्न नाही बंद झाले आहे उद्योगधंदे बंद असल्याने बेरोजगारांची समस्या भविष्यात तीव्र होणार आहे व फक्त शिक्षण घेऊन बाहेर पडणारा तरुण वर्गही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे बेरोजगारी बरोबरच याचा अर्थशास्त्रावर ती खूप मोठा परिणाम होणार आहे बेरोजगारी उपासमारी यांचा वाढणारा महाभयानक संसर्ग कसा रोखायचा हा मोठा प्रश्न आपल्या समोर असणार आहे याला जर आत्ताच आला नाही घातला तर ज्या पद्धतीने कोरूना काळामध्ये सर्व व्यवस्था बंद ठेवावी लागली होती तसेच काहीतरी रोजगार उपलब्ध नाही झाली तर नक्कीच आपल्याला त्याच्यावरती कठोर पावले उचलावी लागतील देश स्वतंत्र झाला तेव्हा आपल्या समोर अर्थव्यवस्थेची चार मॉडेल्स होती. भांडवलशाही, साम्यवादी, समाजवादी आणि गांधीवादी. तेव्हा पंडित नेहरूंनी मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. त्यालाच राज्यशास्त्राच्या परिभाषेत ‘लोकशाही समाजवाद’ म्हटले जाते. लोककल्याणकारी व्यवस्थेला केंद्रस्थानी ठेवून आपण तब्बल चार दशके हे मॉडेल राबवले. यात भांडवलशाहीला स्थान असले तरी नियंत्रणाची व्यवस्था होती, शिवाय कृषिप्रधानता हा अर्थव्यवस्थेचा कणा होता. पुन्हा एकदा आपल्याला रोजगार वाढवण्यासाठी इतिहासाची व जुन्या मॉडेलची पुनरावृत्ति करावी लागेल यात शंकाच नाही
प्राध्यापक नवनाथ गोसावी