Blog

निसर्गावर प्रेम करा–अतिक्रमण नव्हे- – – – –

लेखक:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव
सहशिक्षक-श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद।

निसर्ग आपला मित्र आहे निसर्ग आपला सोबती आहे एवढेच नव्हे तर निसर्ग आपला जीवनसाथी आहे निसर्गावर अंतकरणातून प्रेम करा निसर्ग सांभाळा आणि स्वतःला सांभाळा निसर्ग ही देवता आहे वनदेवता आहे तिला नेहमी प्रसन्न ठेवा पर्यावरणाचा सांभाळ करा निसर्गाचा सरळ सरळ नियम आहे की आपले कर्म करीत रहा निसर्गाला त्रास देऊ नका निसर्गाला त्रास देणे म्हणजेच निसर्गाला इजा पोहोचवणे होय माणसाचं उदाहरण घ्या जर एखाद्याला विनाकारण आपण ईजा पोहोचवत असेल तर तो व्यक्ती गप्प राहील काय ?

एखाद्या छोट्या मुंगीचं उदाहरण आपण घेऊ या विनाकारण मुंगीला त्रास दिला तर ती मुंगी आपल्याला असा चावा घेईल की तिला शेवटी तोडून काढायची पाळी आपल्यावर येईल आज कोरोणा सारख्या महामारी चा विचार केला तर याच्या मुळाशी विषाणू येतो कोरोना चा विषाणू महाभयंकर समस्या आली आहे ती निसर्गाच्या विरुद्ध व्यवहार केल्यामुळे मानव जर आपली जागा आपले शहर आपली वस्ती सोडून पृथ्वीवरील प्राणी जंगलाकडे धाव घेत असेल तर अननाने मानवाचे पोट भरत नसेल विविध प्राण्यां ची हत्या करून तो आपली उपजीविका भागवण्याचा प्रयत्न करत असेल तर हे निसर्गाच्या विरुद्ध केलेले दुष्कृत्य म्हणावे लागेल आपल्यासमोर उदाहरण आहे चीन इराण इटलीसारख्या देशात जर उंदीर पाल साप वटवाघूळ बेडूक इतर विविध पक्षी प्राणी यांचा आहार करीत असतील तर मनुष्य अजून रानटी अवस्थेतच पोहोचत आहे याचा भास झाल्याशिवाय राहत नाही तर सहाजिकच आहे की कोरोना महामारी सारखे विषाणू अधिक उत्पन्न होतील इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठातील तज्ञ डॉक्टरांच्या मते भविष्यात निसर्गातील हजारो विषाणू अशाने जागृत होतील व मानव जातीचा भविष्यात संहार सुद्धा होईल युद्ध असेल, महायुद्धातील मृत्यू झालेली हजारो लाखो मनुष्यप्राणी, बर्फाच्छादित प्रदेशात जमिनीखाली गाढ़लेली प्राण्यांच्या आवशेशा पासून सुद्धा मानवाला खूप मोठा भयंकर धोका होण्याची संभावना भविष्यात आहे नद्या पर्वत जंगले वने पठारे वालुकामय बर्फाच्छादित वने ही आपली निसर्ग संपत्ती आहे पर्यावरणातील सर्व सजीव ही निसर्ग संपत्ती आहेत तिची जपणूक केली पाहिजे निसर्ग देवतेचा सन्मान केला पाहिजे तरच हा निसर्ग सुंदर स्वच्छ निरोगी राहील नाही तर आपल्याच कृत्यामुळे भविष्यात हजारो वर्षापासून गाडून असलेल्या अवशेषांपासून कोरोना पेक्षाही महाभयंकर विषाणू संकटे मानवजातीवर हल्ला करतील पुढील काळात मानवावर अशी संकटे येणारच आहेत असे समजून मानवाने.

आपले निसर्गाशी नाते हे चांगले जपणूकी चे ठेवले पाहिजे निसर्गातील आपल्याला मिळणारया सर्व घटकांचा मर्यादित फायदा करून घेतला पाहिजे उदाहरणार्थ पाणी खनिज पदार्थ तेल दगडी कोळसा विविध प्रकारचे धातू अन्नधान्य यांचा योग्य व प्रमाणात वापर करणे ही काळाची गरज आहे निसर्ग आपला सोबती आहे तो इथेच राहणार आहे अर्थात आपणच त्याचे सोबती आहोत आपणच हे सर्व सोडून जाणार आहोत निसर्ग ,हे निसर्गचक्र कधीच थांबणारे नाही हा इथंच राहणारा आहे कायम आपण निसर्गाचे पाहुणे आहोत अतिथी आहोत त्याप्रमाणे राहिले पाहिजे उपयोग केला पाहिजे निसर्गाच्या नियमात ढवळाढवळ करण्याचा कुठलाही अधिकार माणसाला नाही याची जाणीव माणसाने ठेवली पाहिजे वेगवेगळे वादळ महापुर, बर्फवृष्टी चक्रीवादळ भूकंप तसेच महामारी भविष्यात येतच राहील पण आपल्याला निसर्ग जपला पाहिजे निसर्गाची निसर्गाशी प्रेमाचे अतूट नाते निर्माण केले पाहिजे आपण आपले पर्यावरण स्वच्छ सुंदर निरोगी ठेवणे हे आपले सर्वांचे आद्यकर्तव्य आहे देशातील सर्व नद्या स्वच्छ ठेवणे त्यात कचरा प्लास्टिक न टाकने विविध पर्यटन क्षेत्रातील नद्या तलाव स्वच्छ ठेवणे तसेच वन्यप्राण्यांसाठी हा कचरा प्लास्टिक कॅरीबॅग खूप घातक आहे वन्य प्राण्यांची सुद्धा काळजी घेणे हे आपणा सर्वांचे आद्य कर्तव्य आहे आपण केलेल्या निसर्गाच्या ढवळाढवळी चा विपरीत परिणाम वन्य प्राण्यांवर देखील होत आहे वृक्षतोड लाखो वृक्षांची वृक्षतोड आज होत आहे त्यामुळे झाडांची संख्या कमी झाली त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी झाले पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे लोकसंख्या वाढ ही एक मोठी समस्याच निर्माण झालेली दिसून येते मोठ मोठ्या महानगरांमध्ये दिल्ली मुंबई चे उदाहरण घेतले तर आज प्रदूषणाच्या विळख्यात ही महानगरे सापडलेली आपल्याला दिसून येतात आजच्या या भयंकर संकटाच्या काळात निसर्गच आपल्याला वाचवणार आहे निसर्गच आपल्याला मार्ग दाखवणार आहे म्हणून निसर्ग आपला सांभाळ करतात सुरक्षा देणारा अन्नधान्य पुरवणारा एक देवच आहे म्हणून त्या निसर्ग शक्तीला निसर्ग देवतेला शतशः नमन निसर्गदेवता नमो नमः🙏🏻🙏🏻

धन्यवाद🙏🏻🙏🏻

Related posts