आता उमेदवार नव्हे, तर मतदारचं देणार निवडणुक लढविण्यासाठी पैसे ; निष्ठावंत नेतृत्वासाठी एकवटला जनाधार.
तुळजापूर/प्रतिनिधी
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा धुरळा चालू झाला असून प्रत्येक मतदारसंघात प्रचाराची लगबग सुरु झाली आहे. तामलवाडी पं. स. गणात “एक नोट, एक व्होट” नावाचे आगळे वेगळे अभियान सुरु करत नागरिकांनी निवडणुकीत मतदारांसमोर एक आदर्श ठेवला आहे.
तामलवाडी पं. स. गणात तिरंगी लढत होत असून यामध्ये शिवसेना (उबाठा) पक्षांकडून सौ. संगीता गवळी, काँग्रेस कडून सौ. उषा शिंदे तर भाजपा कडून सौ. मंदाकिनी सावंत आपले नशीब आजमावत आहेत. निवडणुकीत आजच्या घडीला होणाऱ्या पैश्याच्या उधळपट्टी बद्दल बोलायला काही नवीन नाही, परंतु शिवसेना (उबाठा) पक्षाच्या उमेदवार सौ. संगीता जगन्नाथ गवळी यांच्या प्रचारार्थ नागरिकांनी एक आगळा वेगळा उपक्रम राबवत मतदारांसमोर एक आदर्श ठेवला आहे. या अभियानतंर्गत मतदारांनी एक नोट व एक व्होट (मतदान) रुपी आशीर्वाद देत आपल्या उमेदवारास प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचे भावनिक आवाहन नागरिकांमार्फत सर्व मतदार बांधवाना केले आहे.
आमचा उमेदवार एक स्वच्छ प्रतिमेचा, शेतकऱ्यांची जाण असलेला स्वतः शेतकरी असून, ना त्याची कोणतीही गुत्तेदारी अथवा इतर उद्योगधंदे आहेत. ती एक सामान्य कुटुंबातील उमेदवार असून जनतेसाठीची तळमळ हीच तिची ताकद आहे. आम्ही फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावर निवडणुक लढवत असून आमच्या या लढ्यात मतदारसंघातील सर्व मतदारांनी सहभागी होत आपला उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून आणावा असे भावनिक आवाहन यावेळी उपस्थित सर्व नागरिकांच्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी पिंपळा (बु) गावातील नागरिकांसह मतदारसंघातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
