27.5 C
Solapur
September 27, 2023
महाराष्ट्र

दुस-या लाटेत देशातील ६४६ डॉक्टरांनी गमावला जीव!

देशात कोरोनाची दुसरी लाट हाहाकार माजवला. सध्या ही लाट ओसरत असल्याचे चित्र आहे. पण त्यानंतर कोरोनाची तिसरी लाटा येईल अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. दरम्यान कोरोनाच्या दुस-या लाटेमध्ये अनेक रुग्णांचा मृत्यूही झाला. जो पहिल्या लाटेतील मृत्यू दरापेक्षा अधिक असल्याचे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यातच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत ६४६ डॉक्टरांचा मृत्यू झाल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशननं सांगितले आहे.
कोरोना विरुद्धच्या लढाईमध्ये देशातील डॉक्टर्सनी कंबर कसली आहे. त्यातचबरोबर वैद्यकीय कर्मचारी, पोलिस प्रशासनही आघाडीवर आहेत. मात्र, कोरोनाचा फटका त्यांनाही बसला आहे. कोरोना संसर्गाने देशातील विविध राज्यांमध्ये ६४६ डॉक्टरांचा रुग्णांची सेवा करताना मृत्यू झाला आहे.
सर्वाधिक डॉक्टरांचे मृत्यू हे दिल्ली येथे झाले आहे. त्यानंतर बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा क्रमांक लागतो. दिल्लीत १०९, बिहारमध्ये ९७, उत्तर प्रदेशात ७९, राजस्थानमध्ये ४३, झारखंडमध्ये ३९, गुजरातमध्ये ३७, आंध्र प्रदेशमध्ये ३५, तेलंगाणा ३४, तामिळनाडूत ३२, पश्चिम बंगालमध्ये ३०,महाराष्ट्रमध्ये २३, ओडिशामध्ये २३, मध्य प्रदेशात १६ डॉक्टरांचा मृत्यू झाल्याची माहिती आयएमएने दिली आहे.
दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आला. कोरोना लस, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स यांचा तुटवडा जाणवत होता. त्यामुळे डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी जीव धोक्यात टाकून रुग्णांची दिवस-रात्र सेवा करत होते.

Related posts