अखिल भारतीय मराठा महासंघाचा पंढरपुरात रास्ता रोको
सचिन झाडे पंढरपूर प्रतिनिधी- मराठा समाजाला देण्यात आलेल्या अरक्षण न्यायालयाने टिकविन्यासाठी शासनाने भक्कम बाजू मांडली नाही यामुळे न्यायालयाने स्थगिती दिल्याने समाजाचा रोष वाढू लागला असून आज मराठा महासंघाच्या वतीने पंढरपुर येथे रास्तारोको आंदोलन करुन शासनाच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली
मराठा समाजाच्या विविध मागण्यांबाबत
शासनाचे लक्ष वेधत पंढरपुर येथील तीन रस्ता येथे रस्तारोको करण्यात आला.यावेळी विविध मागण्याचे निवेदन प्रांताधिकारी सचिन ढोले,उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ सागर कवडे आणि पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी स्वीकारले.
यावेळी बोलताना अर्जुन चव्हाण यांनी सर्वोच्च न्यायालयाने SEBC मराठा आरक्षणाचा विषय घटनापीठाकडे सुपूर्त करताना
जो स्थगिती आदेश दिला आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे घटना
तज्ञांचा व कायदेविषयक तज्ञांचा सल्ला घेऊन सदरची स्थगिती उठविण्यासाठी आवश्यक तो कायदेशीर
बाब अवलंबीत करावी व मराठा आरक्षण खंडीत होऊ न देता पूर्ववत चालू ठेवने गरजेचे आहे.अत्यंत कष्टाने मिळवलेले आरक्षण हे राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकवून शकले नाही.याबाबत मराठा समाजत संतप्त भावना आहेत.याच्या तीव्र प्रतिक्रिया राज्यात उमटत आहेत.मराठा समाजाला एकही दिवस आरक्षणापासून वंचित ठेवले जाऊ नये.आमच्या मागण्यांबाबत तोडगा निघाला नाही तर आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल याची शासनाने दखल घ्यावी.असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण यांनी यावेळी दिला.