30.7 C
Solapur
September 28, 2023
महाराष्ट्र

लॉकडाउनची शक्यता दाट 

राज्यातील करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आता राज्य शासन अधिकच कठोरपणे निर्बंध लागू करण्याच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर आज वरिष्ठ आरोग्य अधिकारी आणि कोविड टास्क फोर्स यांच्यासोबत पार पडलेल्या बैठीकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाचे निर्देश दिले आहेत. याचबरोबर लॉकडाउनच्यादृष्टीने सूचक इशारा देखील दिल्याचे दिसून आले आहे.
वरिष्ठ आरोग्य अधिकारी आणि कोविड टास्क फोर्स यांच्यासोबत पार पडलेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना सूचना केली आहे की, जर लोकं करोना संबंधित नियमांचे सातत्याने उल्लंघन करत असतील, तर लॉकडाउनसारख्या निर्बंधांसाठी तयार रहा.
तसेच मुख्यमंत्री म्हणाले, “लोकं मार्गदर्शक सूचनांचे गांभीर्याने पालन करत नसल्याने करोना रूग्णसंख्या वाढत आहे. म्हणून लॉकडाउन सारखी कठोर पावल विचारात घेणे आवश्यक आहे.”

Related posts