पंढरपूर –
मंगळवेढा भूमिपुत्र म्हणवून घेणाऱ्या समाधान आवताडे यांनी दामाजी कारखान्याच्या 19500 सभासदांचे सभासदत्व रद्द करून स्वताचा खाजगी कारखाना करण्याचा खटाटोप सुरू असून त्यांचा कुटील डाव हाणून पाडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांना निवडून देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अड नंदकुमार पवार यांनी खोमनाल येथील जाहीर सभेत केले
रड्डे येथील विद्यमान सरपंच संजय कोळेकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करीत गावच्या व मतदारसंघाच्या विकासासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांना विजयी करण्याचे आवाहन केले
पंढरपूर मंगळवेढा विधानसभापोटनिवडणूक निमित्त खोमनाळ हजापूर जालिहाल, रड्डे शिरनांदगीचिक्कलगी,मारोली लांवगी निंबोणी भाळवणी या गावांमध्ये महा विकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारानिमित्त आयोजित प्रचारसभेत बोलत होते यावेळी बोलताना नंदकुमार पवार म्हणाले की स्व किसनलाल मर्दा व स्व रतीलाल शेडजी यांनी मोठ्या कष्टाने गोरगरीब शेतकऱयांना सभासद करून संस्था उभा केली परन्तु विद्यमान चेअरमन व भाजपाचे उमेदवार यांनी दामाजी कारखाना ताब्यात घेतल्यापासून कारखान्याचे वाटोळे केले आहे सध्या कारखान्याचे गळीत झाल्यानंतर कारखान्यात साखरेचे एक पोतेही शिल्लक न ठेवता विकून खाल्ले आहे बग्यास मोलसीस, मळी, जुने भंगार काहीही शिल्लक ठेवले नाही त्यामुळे सभासदांना ऊस बिले मिळणे मुश्किल झाले आहे काही शेतकऱयांना या1500 प्रमाणे बिले दिली असली तरी बाकीची बिले बुडवण्याचा त्यांचा हेतू आहे
राज्यात सर्व कारखान्यांना 97 वी घटना दुरुस्ती लागू झाली परन्तु एकट्या दामाजीच्या प्रशासनाने मात्र तालुक्यातील भूमिपुत्र असलेल्या दामाजी कारखान्याच्या 19500 सभासदांना आपले सभासदत्व रद्द का करू नये याचे नोटिसा काढून त्यांचे सभासदत्व रद्द करण्याचे पाप भाजपाच्या उमेदवार असलेल्या भूमीपुत्रा ने केले आहे हे सभासद रद्द करण्या मागे दृष्ट हेतू असून कारखान्याची 250 एकर जमीन ढापायची तेथे त्यांना फार्महाऊस बांधायचा आहे तसेच सहकार तत्वांवरील असलेला एकमेव राजवाडा त्यांना खाजगी करायचा आहे त्यामुळे त्यांचा हेतू हाणून पाडण्यासाठी भगीरथ भालके यांना निवडून देणे गरजेचे आहे दामाजी कारखान्याची प्रगती कराल या भावनेने सभासदानी आपल्याकडे दामाजी कारखाना ही सत्ता दिली सभासदांची प्रगति करण्यापेक्षा स्वताचा स्वार्थ साधला आहे सभासदाना त्यांच्या हक्कापासून प वंचित ठेवण्याचे काम भूमिपुत्र व भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे यांनी केले आहे तेच आज भूमिपुत्र म्हणून मते मागण्याचा त्यांना नैतिक अधिकार नसल्याचे दामाजी चे माजी चेअरमन नंदकुमार पवार यांनी केला आहे
यावेळी राष्ट्रवाडीचे उमेदवार भगीरथ भालके म्हणाले कै भारत नाना भालके यांनी मोठ्या हिमतीने मंजूर केलेल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला फडणवीस सरकारने आडकाठी आणत योजना होण्यास विरोध केला त्यावेळी फडणवीसांच्या जवळ असलेली आ परिचारक व समाधान आवताडे यांनी योजना होऊ नये यासाठी सातत्याने प्रयत्न केले सत्तेत असताना भाजपाच्या मंडळींनी निधी मिळवण्यासाठी काहीही न करता केवळ राजकारण करून जनतेला फसविण्याचा उद्योग करीत असून त्यांना निधीबाबत जाब विचारावा 35 गाव पाणीपुरवठा योजनेतील 15 गावे वगळण्याची त्यांनी पाप केले तीच मंडळी आज योजनेबाबत खोटा कळवळा आणीत आहे त्यामुळे मतदार बंधूनी खरे कोण खोटे कोण याचा विचार करावा कै आ भारत नानांच्या कामामुळे सतत तीन वेळा विधानसभेत पाठवले असताना ही स्वार्थी मंडळी आ भालके यांनी केलेल्या विकासकामांच्या ठिकाणी खोटी भाषणे ठोकून 11 वर्षात काय केलं हे विचारन्याचा त्यांना नैतिक अधिकार आहे काय ? असा प्रश्न उपस्थित करीत त्यांनी विरोधकांचा समाचार घेत आपल्या प्रश्नांच्या सोडवण्यासाठी विधानसभेत पाठवण्याचे आवाहन भगीरथ भालके यांनी केले यावेळी अड नंदकुमार पवार,भारत बेदरे,लतीफ तांबोळी, अजित जगताप ,साहेबराव शिंदे,सुरेश कट्टे राजाराम सूर्यवंशी राजाभाऊ चेलेकर, तुकाराम कुदळे,प्रवीण हजारे,पांडुरंग चौगुले, पांडुरंग नाईकवाडी,सुरेश कोळेकर,भिवा दोलतडे ज्ञानेश्वर खांडेकर आदी उपस्थित होते