पंढरपूर

अभिजीत पाटलांच्या प्रयत्नांना यश – भोसे फाट्याला सुटले पाणी ; तालुक्यातील अनेक गावे व हजारो शेतकऱ्यांना होणार फायदा

पंढरपूर/प्रतिनिधी:-

टेल टू हेड या नियमाप्रमाणे उजनी डाव्या कालव्यातून सोडण्यात येत असलेल्या पाण्याचे आवर्तन पंढरपूर तालुक्याला मिळण्यासाठी शेतकऱ्यांना कमीत वीस दिवसांचा कालावधी लागणार होता.यामुळे शेकडो हेक्टरवरील पिके जळण्याची भीती व्यक्त केली जात होती.

मात्र त्या शेतकऱ्यांनी अभिजीत पाटील यांची भेट घेऊन आपली अडचण मांडल्यानंतर अभिजीत पाटील यांनी याची तात्काळ दखल घेत पाणी सोडण्यासाठी भीमा पाटबंधारे विभागाचे उपमुख्य अभियंता श्री क्षीरसागर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन पाणी लवकर सोडण्याची विनंती केली होती.तसेच शेतकऱ्यांची अडचण लक्षात आणून दिल्यानंतर केवळ दोनच दिवसांत पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील मुख्य फाट्याला पाणी सोडण्यात आले आहे.

या पाण्यामुळे अनेक पिकांना जीवदान मिळणार असून ऐन उन्हाळ्यात ही पिके जाळण्यापासून वाचणार आहेत त्यामुळे.याबाबत शेतकऱ्यांमधून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.तसेच कोणतेही राजकीय पद नसताना अभिजीत पाटील यांनी तात्काळ केलेल्या मदतीमुळे शेतकऱ्यांकडून आभार मानण्यात आले.

Related posts